Monday, December 23, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी ; कोरोचीत लाईट वायरशॉर्टमुळे शेकडो टीव्ही, फ्रिजचे नुकसान

इचलकरंजी ; कोरोचीत लाईट वायरशॉर्टमुळे शेकडो टीव्ही, फ्रिजचे नुकसान

इचलकरंजी ; कोरोचीत लाईट वायरशॉर्टमुळे शेकडो टीव्ही, फ्रिजचे नुकसा

कोरोची येथे एमएससीबी लाईट वायर शॉर्टमुळे शंभरहून अधिक टीव्ही व पन्नासहून अधिक फ्रिज जळाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. कोरोची डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या शेजारी, इंदिरानगर परिसरातील १०० टीव्ही व ५० भर फ्रिज महावितरणच्या वायर एकमेकांना चिटकल्यामुळे, शॉर्ट होऊन जळाल्यामुळे खराब झाले आहेत. त्या भागातील सामान्य नागरिकांनी कर्ज काढून टीव्ही, फ्रिज घेतले आहेत. यामुळे नुकसान झालेल्या त्या कुटुंबावर आर्थिक बोजा पडणार आहे.

सप्लाय वायरमध्ये डिस्टन्स केबल न लावल्याने महावितरणच्या चुकीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई सर्व नागरिकांना द्यावी, अन्यथा खराब झालेले टीव्हा, फ्रिज महावितरणच्या दारात आणून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने व युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने देण्यात येत आहे…

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -