दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) ‘सालार’ (Salaar) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजआधीपासून हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. प्रभासच्या ‘सालार’ने इतिहास रचला आहे. रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 200 कोटींचा टप्पा पार केला आहे.
प्रभासच्या ‘सालार’ या सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस या सिनेमाची क्रेझ वाढत चालली आहे. प्रभासचा ‘सालार’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.
‘सालार’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या… (Salaar Box Office Collection)
सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार,’सालार’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 90.7 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 56.35 कोटींची कमाई केली. वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ झाली. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी ‘सालार’ने 61 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं आहे. एकंदरीतच रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 208.5 कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘सालार’ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 243.8 कोटींचा गल्ला जमवला आहे.सालार’समोर ‘डंकी’ पडला फिका
‘सालार’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे. प्रभासच्या ‘सालार’ने कमाईच्या बाबतीत शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘डंकी’लादेखील मागे टाकलं आहे. ‘सालार’ने रिलीजच्या तीन दिवसांतच 200 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. तर दुसरीकडे शाहरुखच्या ‘डंकी’ने चार दिवसांत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकंदरीतच ‘सालार’ने ‘डंकी’पेक्षा खूपच जास्त कमाई केली आहे.
‘सालार’ची स्टारकास्ट जाणून घ्या…
‘सालार’ या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा केजीएफ फेम प्रशांत नील यांनी सांभाळली आहे. या सिनेमात प्रभास मुख्य भूमिकेत आहे. तर प्रशांतसह श्रृती हासन, पृथ्वीराज सुकुमारन आणि जगपती बाबू महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमातील सर्वच कलाकारांनी आपली भूमिका चोख निभावली आहे.
सुपरस्टार प्रभालचा ‘सालार’ हा सिनेमा त्याच्या करिअरमधला पाचवा टॉप ग्रोसर सिनेमा ठरला आहे. याआधी त्याच्या ‘राधे श्याम’, ‘आदिपुरुष या सिनेमांनी जगभरात चांगली कमाई केली आहे. हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. ‘आदिपुरुष’ या सिनेमावर एकीकडे मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात हा सिनेमा कमी पडला होता.