Sunday, December 22, 2024
Homeक्रीडारोहित शर्माने पत्रकार परिषदेत मन मोकळं केलं, म्हणाला…

रोहित शर्माने पत्रकार परिषदेत मन मोकळं केलं, म्हणाला…

पहिला कसोटी सामना 26 डिसेंबरला भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामना सुरू होणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्व मुद्द्यांवर दिलखुलासपणे उत्तरे दिलीत. वर्ल्ड कप फायनलमध्ये झालेला पराभव, मोहम्मद शमी या मालिकेला मुकला आहे.

रोहित शर्मा काय म्हणाला?
वर्ल्ड कपमधील पराभवानंतर सर्व संघ निराश झाला होता. मात्र हा पराभव विसरत आता पुढे जावं लागणार आहे. वर्ल्ड कपसाठी खूप मेहनत केली. 10 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती फायनलमध्येही बऱ्याच गोष्टी चांगल्या झाल्या पण काय चुकलं काय नाही याबाबत काय बोलायचं, सर्वांना झालेला पराभव विसरत पुढे जावं लागणार असल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे.

देशाला गौरव मिळवून द्यायचे आहे, आम्ही दक्षिण आफ्रिकेत एकही मालिका जिंकलेली नाही. आफ्रिकेविरूद्धची कसोटी मालिका जिंकल्यावर वर्ल्ड कप पराभवाच्या दु:खावर मलमा लावल्यासारखं असेल असं मला वाटत नाही. वर्ल्ड कप वर्ल्ड कप असतो. देशासाठी गौरव मिळवून देणारे खेळाडू आपल्याकडे आहेत, असं रोहित म्हणाला. रोहितच्या या उत्तरावरून दिसून आलं की पराभव सहजासहजी तो विसरणार नाही.

क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेट हा सर्वात अवघड फॉरमॅट आहे. मी सर्व खेळाडूंच्या डोळ्यात उत्साह पाहायला आहे, त्यांनाही कसोटी क्रिकेट खेळायचं आहे. खेळडूंनी जास्तीत जास्त कसोटी क्रिकेट खेळावं अशी माझी इच्छा आहे. या फॉरमॅटमध्ये खेळाडूंचं कौशल्य दिसून येत असल्याचं रोहित शर्माने सांगितलं.

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, केएल राहुल (WK), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (VC). ), प्रसिध कृष्णा आणि केएस भरत (WK).

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -