Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगअभिनेता रोनित रॉय वयाच्या 58 व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहल्यावर; पत्नीसोबत लिपलॉक करतानाचा...

अभिनेता रोनित रॉय वयाच्या 58 व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहल्यावर; पत्नीसोबत लिपलॉक करतानाचा व्हिडीओ व्हायरल

 

 

अभिनेता रोनित रॉय (Ronit Roy) तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. रोनितने त्याची पत्नी नीलम बोस रॉयसोबतच पुन्हा एकदा लग्न केलं आहे. लग्नाला 20 वर्ष झाल्यानिमित्ताने हिंदू रितीरिवाजांनुसार त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. वयाच्या 58 व्या वर्षी अभिनेत्याने पुन्हा एकदा शाही थाटात लग्न केलं आहे. त्यांचे लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

 

रोनित रॉयने त्याची पत्नी नीलम बोस रॉयसोबत लग्न केलं आहे. रोनित आणि नीलमचं लग्न 2003 मध्ये झालं होतं. आता 20 वर्षांनंतर ते पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकले आहेत. लग्नाच्या वीस वर्षांनंतर त्यांनी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केलं आहे.

 

 

रोनितने शेअर केले लग्नसोहळ्याचे व्हिडीओ

 

रोनितने लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातील एका व्हिडीओमध्ये रोनित पत्नीसोबत लिपलॉक करताना दिसत आहे. चाहत्यांना हा व्हिडीओ आवडला आहे. रोहितने पुन्हा लग्न केल्यामुळे चाहते त्याचं कौतुक केलं आहे. लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याआधी रोनितने शंकराच्या मंदिरातील काही फोटो शेअर करत चाहत्यांना हिंट दिली होती. व्हिडीओ शेअर करत रोनितने लिहिलं होतं,”मंदिरात जोरदार तयारी सुरू आहे. आज पुन्हा एकदा मी लग्न करतोय. तुमच्या शुभेच्छांची आणि आशीर्वादाची गरज आहे”. आधी डेटिंग मग लग्न…

 

रोनितचं पहिलं लग्न जोआनासोबत झालं होतं. पण काही कारणाने ते विभक्त झाले. त्यानंतर रोनित अभिनेत्री नीलम सिंहसोबत लग्नबंधनात अडकला. एकमेकांना तीन वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला होता. नीलमने ‘सिलसिला है प्यार का’, ‘सुराग’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

 

 

रोनित रॉय कोण आहे? (Who is Ronit Roy)

 

रोनित रॉय हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने ‘कसौटी जिंदगी की’, ‘मिस्टर बजाज’ अशा अनेक कलाकृतींसाठी तो ओळखला जातो. पती, वडील आणि मुलाची भूमिका त्याने चोख निभावली आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे. रोनितला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -