Saturday, September 30, 2023
Homeकोल्हापूरसीपीआर मधील जळीतग्रस्तांच्या नातेवाईकांना मदत कधी?

सीपीआर मधील जळीतग्रस्तांच्या नातेवाईकांना मदत कधी?

नगर जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडवात 11 जणांचा बळी गेला. यात सहा जणांचा गुदमरून, तर पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 6 नोव्हेंबर) घडली. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 7 लाख रुपयांची मदत आरोग्य विभागाने जाहीर केली. प्रातिनिधिक स्वरूपात एका कुटुंबाला धनादेशही दिला. अशीच घटना सीपीआर च्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये 28 सप्टेंबर 2020 रोजी घडली होती. येथे झालेल्या स्फोटात तीन रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेला वर्ष सरले तरी एक रुपयाची मदत मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून मिळालेले नाही. ‘नगरमध्ये होरपळलेली ती माणसंच होती; सीपीआर मधील नव्हती का,’ असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे

सीसीटीव्ही बंद होता की बंद केला
नगरमधील अग्नितांडवाची वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन तगडी चौकशी समिती नेमली आहे. सात दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत; पण कोल्हापूरच्या सीपीआर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये झालेल्या स्फोटाची चौकशीचे धाडस वरिष्ठ पातळीवर का झाले नाही. या स्फोटाची चौकशी करण्यासाठी स्थानिक पातळीवर चौकशी समिती नेमली. या समितीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे. स्फोटाचे नेमके कारण काय, कशामुळे हा स्फोट झाला, स्फोटात तीनच रुग्ण दगावले की अन्य किती, फायर ऑडिटचे काय, व्हेंटिलेटर उपलब्ध नसताना त्या रुग्णांवर उपचार झालेत कसे, या स्फोटाला जबाबदार कोण, चौकशीला विलंब का, सीसीटीव्ही बंद होता की बंद केला, त्या रात्री वॉर्डात डॉक्टर, परिचारिका होते का, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहोत.

कोरोना संकटकाळात सीपीआर पूर्ण वेळ कोरोनाबाधितांच्या सेवेत होते. जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर 2020 मध्ये कोरोनाचा उद्रेक झाला. बाधितांना उपचारासाठी बेड, ऑक्सिजन व्हेंटिलेटरही मिळत नव्हते. याच दरम्यान सीपीआरच्या ट्रॉमा केंअर सेंटरमध्ये स्फोट होऊन आग लागली. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी आगीत तिघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. प्रत्यक्ष या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र