Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाऋतुराज गायकवाड बद्दल सुनील गावस्कर यांनी केली मोठी भविष्यवाणी

ऋतुराज गायकवाड बद्दल सुनील गावस्कर यांनी केली मोठी भविष्यवाणी

रविवारी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विश्वविजेता होण्यासाठी एकमेकांसोबत भिडणार आहेत. टी२० वर्ल्ड कप मधून टीम इंडिया सुपर १२ मधील साखळी सामन्यातच बाहेर पडली. हे अपयश बाजूला सारुन टीम इंडिया पुढील आव्हानासाठी सज्ज झाली आहे. न्यूझीलंडचा संघ १७ नोव्हेंबर पासून भारताच्या दौऱ्यावर येत आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी २० सामन्यांसाठी भारताने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली आहे. त्यामध्ये पुण्याचा ऋतुराज गायकवाड याचाही समावेश आहे. या उद्योन्मुख खेळाडूचे कौतुक करत जेष्ठ क्रिकेट पटू सुनील गावस्कर यांनी मोठी भविष्यवाणी देखिल केली आहे.

न्यूझीलंडचा संघ भारतामध्ये तीन टी२० सामने व २ कसोटी सामने खेळणार आहे. पहिला टी २० सामना १७ नोव्हेंबरला खेळला जाणार आहे. तर टी२० मालिकेसाठी टीम इंडियामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. संघातील अनुभवी खेळाडूंना विश्रांती देत आयपीएल मध्ये चांगली कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले आहे. विराट कोहली, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, रिषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर यांच्या जागी व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, आवेश खानसह ऋतुराज गायकवाड यांना संघात स्थान देण्यात आले आहे.

ऋतुराज गायकवाड याने आयपीएलमध्ये चेन्नई कडून खेळताना यंदाचा हंगामात सर्वाधिक धावा बनवत ऑरेंज कॅप पटकावली होती. त्याने आयपीएल मध्ये ६३५ धावा बनवून सर्वच दिग्गजांना पिछाडीवर टाकले होते. सलामीवीर म्हणून त्याने चैन्नई संघामध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती. या त्याच्या कामगिरीची दखल घेत त्याला न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली आहे.

ऋतुराज गायकवाड हा अत्यंत गुणी आणि प्रतिभावान खेळाडू असल्याचे बोलले जात आहे. दस्तुरखुद्द भारताचे माजी कर्णधार आणि लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी ऋतुराजचे कौतुक केले आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत बीसीआयने नव्या खेळाडूंना संधी दिली. या निर्णयाचे सुनील गावस्कर यांनी स्वागत करत हा अतिशय चांगला निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गावस्कर हे ऋतुराज बद्दल बोलताना म्हणाले, ऋतुराज गायकवाड हा अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. चैन्नई सुपर किंग कडून खेळताना आपल्या फलंदाजीने त्याने सर्वाना प्रभावित केले आहे. या फलंदाजामध्ये खूप चांगली क्षमता आहे. हा भविष्यात खूप मोठा खेळाडू बनू शकतो. सध्या त्याला टी२० च्या संघात स्थान मिळाले आहे. भविष्यात तो भारतासाठी तिन्ही प्रकारच्या संघात प्रतिनिधित्व करेल अशी भविष्यवाणी सुनील गावस्कर यांनी ऋतुराज गायकवाड विषयी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -