महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे, नांदेड, सोलापूर आणि पुणे विभागात भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एम सी डॉट इन जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं उमेदवारांना नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सोलापूर आणि पुणे येथे नोकरी करावी लागेल. प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदाच्या 100 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवार यासाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या https://www.mced.co.in/ या लिंकला भेट देऊन अर्ज सादर करावेत, असं आवाहन करण्यात आलंय.अर्ज प्राप्त झाल्यानंतर मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्ज कधी आणि कुठे करावा?
एमसीईडीनं जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणं नांदेड, सोलापूर आणि पुणे विभागात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक पदाच्या 100 जागांसाठी पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या https://www.mced.co.in/ या लिंकला भेट द्यावी.
पात्रता
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असणं आवश्यक आहे. उमदेवरांकडे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केल्याचा अनुभव आवश्यक आहे. याशिवाय संगणीकय ज्ञान त्याच्याकडं असणं आवश्यक आहे. उद्योजकता विकास व उद्योजकतेशी निगडीत कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाची जबाबदारी प्रशिक्षण आयोजकाची असेल.
या विभागात शंभर पदांची भरती ; भरपूर पगार
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -