बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) 2023 मध्ये धमाकेदार कमबॅक केलं आहे. किंग खानचे सलग तीन सिनेमे सुपरहिट झाले आहेत. शाहरुखसाठी हे वर्ष खूपच खास होतं. एकीकडे त्याचे सिनेमे धमाका करत असताना दुसरीकडे त्याची लेक सुहाना खाननेदेखील (Suhana Khan) ‘द आर्चीज’ (The Archies) या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ‘द आर्चीज’च्या रिलीजनंतर सुहाना खान आणि अगस्त्य नंदा (Agastya Nanda) यांच्या डेटिंगच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. मिहिर आहूजाने (Mihir Ahuja) यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सुहाना खान (Suhana Khan) आणि अगस्त्य नंदा (Agastya Nanda) अभिनीत ‘द आर्चीज’ (The Archies) हा सिनेमा 2023 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमानंतर सुहाना खानच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शाहरुखची लेक सुहानाचं नाव अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा नातू अगस्त्य नंदासोबत (Agastya Nanda) जोडलं गेलं आहे. ‘द आर्चीज’ या सिनेमात दोघे एकत्र दिसले होते.
सुहाना-अगस्त्यच्या अफेअरच्या चर्चांवर मिहिर आहूजाने सोडलं मौन
शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांच्या अफेअरच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. आता याबद्दल ‘द आर्चीज’ फेम मिहिर आहूजाने मौन सोडलं आहे. जूमला दिलेल्या मुलाखतीत मिहिर म्हणाला,”सुहाना आणि अगस्त्य यांच्या रिलेशनबद्दल मला नक्की माहिती नाही”. मिहिरच्या या वक्तव्यानंतर सुहाना आणि अगस्त्य यांच्या रिलेशनबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
‘द आर्चीज’मधील त्यांचे अनेक रोमँटिक सीनदेखील व्हायरल होत आहेत.’द आर्चीज’ या सिनेमातील सुहानाचं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडलं होतं. तर दुसरीकडे मात्र अगस्त्य नंदाचं खूप कौतुक झालं होतं. ‘द आर्चीज’ या सिनेमानंतर सुहानाने कोणत्याही सिनेमासाठी आपला होकार दिला नाही. तर दुसरीकडे अगस्त्यचा ‘इक्कीस’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.