महिला सुरक्षेसाठी कठोर कायदे बनवूनही अजूनही महिलांविरोधात गुन्हे घडत आहेत. देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात महिलांना अत्याचार, छळ याचा सामना करावा लागतोय. अलीकडेच एका महिलेवर पाच जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये नोएडा येथे शॉपिंग मॉलजवळ ही घटना घडली. या प्रकरणात तिघांना अटक झाली आहे. दोघे जण अजून फरार आहे. यात मुख्य आरोपी स्थानिक बाहुबली असल्याची माहिती आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.
काही दिवसांपूर्वी ही सामूहिक बलात्काराची घटना घडली. गुन्हेगार दबंग असल्याने पीडित महिलेने लगेच पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली नाही. पोलिसांनी ही माहिती दिली. आरोपींनी तिला ब्लॅकमेल करुन छळ सुरु केला. त्यानंतर तिने पोलीस स्थानकात धाव घेतली. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय.
कधी पोलिसात तक्रार नोंदवली?“30 डिसेंबरला सेक्टर 39 मधील पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवण्यात आला, त्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली” अशी माहिती पोलीस प्रवक्त्याने दिली. “राजकुमार, आझाद आणि विकास अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. रवी आणि मेहमी हे दोघे फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरु आहेत” असं पोलीस प्रवक्त्याने सांगितलं. अटक केलेल्या आरोपींना स्थानिक कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.