Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगइलॉन मस्क सोबत मिळून Vodafone-Idea देणार Jio ला टक्कर? समोर आली महत्वाची...

इलॉन मस्क सोबत मिळून Vodafone-Idea देणार Jio ला टक्कर? समोर आली महत्वाची माहिती

 

 

Vodafone-Idea बद्दल बाजारात अनेक बातम्या येत आहेत. अशीच एक बातमी समोर आली होती, ज्यात दावा करण्यात आला होता की कर्जबाजारी असलेली Vodafone-Idea इलॉन मस्कच्या स्टारलिंकसह टाय-अप करू शकते. ह्याबाबत Vodafone Idea नं म्हटलं आहे की, “आम्ही सांगू इच्छितो की आम्ही कंपनी अश्या कोणत्याही कंपनीच्या संपर्कात नाही.”BSE नं ह्या बातम्यांबाबत कंपनीकडून स्पष्टीकरण मागवलं होतं. ही बातमी समोर आल्यानंतर वोडाफोन-आयडियाच्या शेयरच्या किंमतीत अचानक वाढ झाली होती. याआधी बातमी समोर आली होती की भारतातील टेलीकॉम बाजारात वोडाफोन-आयडिया मस्कसह टाय-अप करू शकते. कंपनीनं म्हटलं, “आमच्याकडे ह्याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती.”गेल्या काही महिन्यापासून अफवा होती की भारतीय मार्केटमध्ये मस्क ह्यांच्या स्टारलिंकला प्रवेश करता यावा ह्यासाठी वोडाफोन आयडियामधील ३३.१% हिस्सा भारत सरकार विकू शकतं. परंतु ह्या रिपोर्ट्स बाबत कोणताही निश्चित खुलासा झालेला नाही. जर मस्क ह्यांनी प्रवेश केला तर भारतीय टेलीकॉम बाजारात तीन बिलिनियर्सची टक्कर होईल. ह्यात मस्क, रिलायन्स जिओचे मुकेश अंबानी आणि भारती एयरटेलचे सुनील मित्तल ह्यांचा समावेश असेल.गेल्या आठवड्यात वोडाफोन आयडियाच्या शेयरमध्ये चांगली उलाढाल झाली होती. बातमी आली होती की जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती व्हायब्रन्ट गुजरात बिजनेस समिटमध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेतून भारतात येऊ शकतो. अंदाज लावला जात होता की १० जानेवारी १२ ते जानेवारी दरम्यान ह्या समिटमध्ये मस्क टेस्लाची फॅक्ट्री भारतात सुरु करण्याची घोषणा करेल.

 

वोडाफोन आयडिया ५जी

अलीकडेच कंपनीच्या वेबसाइटच्या फुटर सेक्शन मध्ये सांगण्यात आलं आहे, “पुणे आणि दिल्लीतील निवडक ठिकाणी ५जी सर्व्हिस लाइव्ह करण्यात आली आहे, जिथे भारतात विआय ५जी नेटवर्कची क्षमता अनुभवता येईल. वेबसाइटनुसार, युजर्स 5G रेडी सिमच्या मदतीनं हाय-स्पीड इंटरनेट अ‍ॅक्सेस करता येईल. सध्या वोडाफोन आयडियाचं ५जी नेटवर्क पुण्यातील शिवाजी नगर भागात आणि दिल्लीत इंडिया गेट व प्रगती मैदान भागात उपलब्ध झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -