29 दिवस आणि 45 सामन्यांनंतर T20 विश्वचषक 2021 चा चॅम्पियन सापडला आहे. ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव करत टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिंच अँड कंपनीने 18.5 षटकांत 2 गडी गमावून न्यूझीलंडवर विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नर (53) आणि मिचेल मार्श (77) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. 14 वर्षांच्या T20 विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलिया प्रथमच चॅम्पियन बनला आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारूंची सुरुवात खराब झाली आणि तिसऱ्या षटकात ट्रेंट बोल्टने अॅरॉन फिंचची (5) विकेट घेतली. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शने 59 चेंडूत 92 धावा जोडून संघाला मजबूत स्थितीत आणले. ही भागीदारी बोल्टने वॉर्नरला (53) बाद करून तोडली. ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श यांनी तिसऱ्या विकेटसाठी 39 चेंडूत 66 धावा जोडून ऑस्ट्रेलिया संघाला चॅम्पियन बनवले.
t20 विश्वचषक 2021 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकात 4 गडी गमावून 172 धावा केल्या. केन विल्यमसनने (85) सर्वाधिक धावा केल्या.
ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच T20 चॅम्पियन; NZ चा 8 विकेट्सनी पराभव
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -