Tuesday, May 21, 2024
Homenewsखून झालेल्या महिलेच्या शरीराचे तुकडे पिरंगुट आणि मुठा घाटात सापडले..

खून झालेल्या महिलेच्या शरीराचे तुकडे पिरंगुट आणि मुठा घाटात सापडले..फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील महिलेच्या खूनाचे गुढ १४ दिवसांनी मुळशी हद्दीत उलगडले. मयत रोजिना रियाज पानसरे उर्फ कविता चौधरी या बेपत्ता झाल्याची तक्रार फरासखाना पोलिस ठाण्यात दाखल झाली होती त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला पकडले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

महिलेच्या शरीराचे अनेक तुकडे करून मुळशी तालुक्यातील पिरंगुट आणि मुठा घाटात फेकण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हनुमंत अशोक शिंदे (वय ४०, रा. २७७, बुधवार पेठ) याचे खून केलेल्या महिलेसोबत विवाह बाह्य अनैतिक संबंध होते.

त्यामध्ये दोघांचा वाद झाला आणि त्याने तिचा १० तारखेला गळा दाबून खून केला. आणि १२ तारखेला तिच्या मृत शरीराचे तुकडे करून ते वेगवेगळ्या सिलपॅक असलेल्या बॅगेत भरून पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिराजवळ एक बॅग पन्नास फूट खोल घाटात फेकून दिली.

तर दुसरी बॅग लवासा(Lavasa) रोडवर उरावडे आंबेगाव परिसरात मुठा घाटात फेकून दिली. आरोपीने मृतदेह कापण्यासाठी वापरली हत्यारे भूगाव येथील मानस लेक तलावामध्ये फेकून दिली आहेत. त्यानंतर आरोपी फरार झाला होता. गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला शिताफीने पकडल्यानंतर फरासखाना पोलिसांनी आरोपीला सोबत आणून पिरंगुट आणि मुठा घाटातून कुजलेल्या अवस्थेत असलेला मृतदेहाचे मिळालेले भाग ताब्यात घेतले. यावेळी फॉरेन्सिक लॅबचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते.

मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापनचे प्रमोद बलकवडे आणि त्यांची सर्व टीम पोलिसांना सहकार्य करत होती.त्यांनीच या महिलेचे मृतदेह पोलिसांना शोधून दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -