मित्रांनो कधीतरी एकदा अशी स्थिती येते की आपल्या भक्तीमुळे प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. याचा अर्थ असा की स्वामींचा आपल्यावर वरदहस्त आहे व आपल्या जीवनातील दुःख त्रास अडचण सर्व काही दूर होणार आहेत.
मित्रांनो,सुख दुःख, ऊन सावली सारख आहे. जर दु:ख जास्त झाले असेल तर सुख सुद्धा पाठीमागे येत असतं. जसं ऋतु येतात तसे सुख- दुःख आपल्या आयुष्यात येत जात असतं. सुखा अगोदर स्वामी आपल्याला काहीतरी संकेत देत असतात आणि या संस्थेद्वारे आपल्याला कळते की आपल्या आयुष्यात काही तरी सुख येणार आहे तसे संकेत स्वामी आपल्याला देत असतात.
मित्रांनो,सकाळी उठल्यावर आपण आपल्याला आरशात पाहिल्यावर चेहऱ्यावर वेगळीच चमक दिसत असेल आपला चेहरा तेजस्वी दिसत असेल तर हा एक शुभ संकेत आहे. त्यामुळे आपले नशीब लवकरच चमकणार असल्याचा हा संकेत आहे.
दुसरा शुभसंकेत म्हणजे आपले डोळे फडफडणे डोळे फडफडणे हा एक शुभ संकेत आहे. पुरुषांसाठी उजवा डोळा फडकणे शुभ असते तर स्त्रियांसाठी डावा डोळा फडकणे शुभ असते.
मित्रांनो, जर आपल्या घरासमोर गाय येऊन सारखी हंबरत असेल तर हा एक शुभ संकेत आहेत. या संकेताचा अर्थ असा की लवकरच आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचे आगमन होणार आहे. देवी महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे.
एखादे माकड आपल्या घराच्या छतावर बसून काहीतरी खात असेल आणि खाताना त्यातील काही पदार्थ तसाच छतावर पडुन राहिला तर तेथून निघून गेले तर हा एक शुभ संकेत आहे. याचा अर्थ आपल्या घरामध्ये आता भरपूर धनधान्य येणार आहे. आता यावर आपण असेच समजायचे की आपल्या आयुष्यात आता कुठून ना कुठून तरी धनलाभ होणार आहे.
जर आपल्या स्वप्नात गोमातेची सेवा करत असल्याचे स्वप्न पडलं व आपल्याला खूप आनंद होत आहे असं दिसेल हा सुद्धा एक धनलाभाच्या संकेत आहे. आपण कपडे चेंज करत असताना आपल्या खिशातून काही नाणी खाली पडली तर हा समजा शुभ संकेत आहे. आयुष्यात धनलाभ घेऊन येण्याचा शुभसंकेत आहे.
आपल्या घरातील व्यक्ती एखाद्या शुभकार्याचे संबंधित बोलत असाल आणि तेथे एक चिमणी येऊन बसली आणि तुम्हाला न घाबरता तुमचे बोलणे ऐकत असेल तर समजून जा शुभ कार्य पार पडेल. तर हा एक शुभ संकेत आहे.
जर आपल्या लग्नासाठी मुलगी बघायला जात आहोत तर समोरून एखादी स्त्री सोळा शृंगार घालून नटूनथटून येताना आपल्याला दिसली तर हा एक शुभ संकेत आहे. याचा अर्थ आपल्याला मिळणारी जोडीदार ही खूप सुशील, संस्कारी आणि आदर्श असेल. आपले जीवन त्या स्त्रीमुळे उजळून निघणार आहे.
मित्रांनो तुम्हाला कसा वाटली ही माहीती ते पेज ला लाईक करुन कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आमचे पेज शेअर करायलाही विसरू नका.
वरील माहिती ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातून तसेच वेगवेगळ्या शास्त्राच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.
जर स्वामींचे ‘हे’ संकेत आपणाला मिळाले
तर लगेच चमत्कार दिसेल :
श्री स्वामी समर्थ
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -