Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगठाकरे गटाचे आमदार पोलिसांच्या ताब्यात; उत्पन्नापेक्षा जास्त 118% संपत्ती असल्याचा आरोप

ठाकरे गटाचे आमदार पोलिसांच्या ताब्यात; उत्पन्नापेक्षा जास्त 118% संपत्ती असल्याचा आरोप

एसीबी चौकशीनंतर ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. उत्पन्नापेक्षा 118% संपत्ती जास्त असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आलाय. प्रदीर्घ चौकशीनंतर पोलिसांनी राजन साळवी यांना ताब्यात घेतले. राजन साळवी यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली आहे. या कारवाईमुळे त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

आमदार राजन साळवी यांच्यावर उत्पन्नापेक्षा जास्त 118% संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी म्हणून स्वतः राजन साळवी, पत्नी आणि त्यांच्या मुलाचा समावेश आहे. राजन साळवींच्या यांच्या घरी गुरुवारी सकाळीच एसीबीनं धाड टाकली. रत्नागिरी, राजापूरसह इतर ठिकाणी धाड टाकली. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी एसीबीच्या रडारवर आहेत. मालमत्ता प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांचीही चौकशी झालीय. आता एसीबीनं गुन्हा दाखल केल्यानं त्यांच्या अडचणीत वाढ झालीय. मात्र, अटकेला घाबरत नसून आपण जामिनासाठी अर्ज करणार नसल्याचं साळवींनी ठामपणे सांगितलं

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -