Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगअभिनेत्रीच्या कार्यक्रमातील धावडधिंगा अंगाशी 200 जनाविरोधात गुन्हे

अभिनेत्रीच्या कार्यक्रमातील धावडधिंगा अंगाशी 200 जनाविरोधात गुन्हे

नुकताच एक हैराण करणारा प्रकार घडलाय. चक्क अभिनेत्रीच्या कार्यक्रमात धांगडधिंगा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. आता या प्रकारानंतर पोलिस हे चांगलेच अॅक्शन मोडमध्ये आल्याचे बघायला मिळतंय. हे प्रकरण धिंगाना घालणाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आल्याचे बघायला मिळतंय. पोलिसांनी आता या प्रकरणात तब्बल 200 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल केलाय. विशेष म्हणजे या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी अभिनेत्रीला सुखरूप बाहेर काढत गाडीमध्ये बसून दिले आणि रवाना केले.

हा धक्कादायक प्रकार बिहारच्या औरंगाबादमध्ये घडलाय. अभिनेत्री अक्षरा सिंग ही एका दुकानाच्या उद्धाटनासाठी बिहारच्या औरंगाबादमध्ये पोहचली. यावेळी अभिनेत्रीला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. अभिनेत्रीला उद्धाटन स्थळी पोहचणे देखील अवघड झाले. उद्धाटन स्थळी अभिनेत्री पोहचली खरी मात्र, तिथून अभिनेत्रीला सुखरूप बाहेर काढणे पोलिसांसाठी मोठे आवाहन ठरले.

अभिनेत्रीला पाहून काही लोक हे धिंगाना घालताना दिसले. यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. मग काय उपस्थित चाहते अधिकच संतापले आणि त्यांनी थेट पोलिसांवरच दगडफेक करण्यास सुरूवात केली. या दगडफेकीमध्ये काही पोलिस कर्मचारी हे जखमी देखील झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -