Friday, December 27, 2024
Homeब्रेकिंगफेब्रुवारी महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर

फेब्रुवारी महिन्यात तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर

 

धावपळीच्या जीवनात आपल्याकडून महत्वाची काम राहून जातात. अशातच अवघ्या काही दिवसांवर फेब्रुवारी महिना येऊन ठेपला आहे. यापार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. जमात्र जाहीर केलेल्या यादीनुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे तुमची बँकेमध्ये महत्वाची काम असतील तर लवकरात लवकर उरकून घेणं गरजेचं आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्ट्यांची यादी केली जाहीर : जर तुमचं बँकेमध्ये महत्वाचं काम असेल तर तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे ती तपासणं महत्वाचं आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये सण आणि आठवड्याच्या सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे तुमची देखील बँकेची काम असतील तर तुम्ही बँकाँच्या सुट्टीचं वेळापत्रक पाहणं महत्वाचं आहे.
10 फेब्रुवारी 2024 : दूसरा शनिवार

11 फेब्रुवारी 2024 : रविवार

10 ते 12 फेब्रुवारी 2024 : लोसरनिमित्त सिक्किम राज्यात बँकांना सुट्टी14 फेब्रुवारी 2024 : वसंत पंचमी निमित्त हरयाणा, ओदिशा, पंजाब, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये बँका बंद राहतील.

15 फेब्रुवारी 2024 : लुई-नगाई-नी निमित्त मणिपूरमध्ये बँकांना सुट्टी असेल.

18 फेब्रुवारी 2024 : रविवार

19 फेब्रुवारी 2024 : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व बँकां बंद राहतील.

20 फेब्रुवारी 2024 : मिजोरम आणि अरुणाचल प्रदेश राज्य दिनानिमित्त या राज्यांमध्ये सुट्टी असेल.

24 फेब्रुवारी 2024 : चौथा शनिवार

25 फेब्रुवारी 2024 : रविवार

बँक सुट्ट्यांची यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आधारावर जारी केली जाते. तसेच सुट्ट्यांची यादी ही देशभरात आणि राज्यांमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांवर आधारित असते. तसेच फेब्रुवारी हा महिना लीप असल्याने या वर्षात 29 दिवस असणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -