शेअर बाजारात ट्रेडिंग (trading)करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. उद्या शनिवार असूनही शेअर बाजार सुरू राहणार असून बाजारात स्पेशल ट्रेडिंग होणार आहे. सर्वसाधारणपणे शनिवार आणि रविवारच्या दिवशी राष्ट्रीय शेअर बाजार व मुंबई शेअर बाजार हे दोन्ही बाजार बंद असतात. मात्र, उद्या तसं होणार नाही.
यापूर्वी शेअर बाजार(trading) शनिवार, २० जानेवारी रोजी खुला राहणार असून या दिवशी बाजारात विशेष सत्रात व्यवहार होईल असं NSE आणि BSE ने २९ डिसेंबर २०२३ रोजी कळवले होते. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने हे विशेष सत्र रिकव्हरी साइटवर साइटवर इंट्राडे स्विच-ओव्हरसाठी आज विशेष सत्र आयोजित केले होते. अशाप्रकारे आज दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर नियमित ट्रेडिंग सुरू राहील.
उल्लेखनीय म्हणजे भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासात प्रथमच इतिहासात पहिल्यांदाच शनिवारी स्टॉक मार्केट सुरू असणार असून नव्या वर्षात या ट्रेडिंग सेशनच्या माध्यमातून स्टॉक एक्स्चेंज डिझास्टर रिकव्हरी (DR) साइटचं ट्रायल केलं जाईल. एखाद्या संकटाच्या परिस्थितीत कोणत्याही अडचणीविना ट्रेडिंग सुरु राहावं
या उद्देशाने ट्रायल घेतलं जाणार असून मार्केट आणि गुंतवणूकदारांना स्थिरता देण्याचा यामागचा मुख्य हेतू आहे.देशांतर्गत मार्केट शनिवारी सकाळी ९ ते दुपारी ३:३० वाजेपर्यंत खुला राहील आणि सोमवारी बंद राहील. सोमवार, २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याच्या निमित्ताने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, सोमवारी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टीमुळे इक्विटी, कर्ज आणि मनी मार्केटमधील व्यवहार बंद राहतील.
अयोध्येतील राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यानिमित्त सोमवारी, २२ जानेवारी रोजी महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारनेही दुपारी अडीच वाजेपर्यंत अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे.