Tuesday, February 27, 2024
Homeब्रेकिंगथिएटरमध्ये पाहता येणार रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा! 'पीव्हीआर' करणार थेट प्रक्षेपण; किती आहे...

थिएटरमध्ये पाहता येणार रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा! ‘पीव्हीआर’ करणार थेट प्रक्षेपण; किती आहे तिकीट?

सध्या जगभरातील श्रीरामभक्त केवळ 22 जानेवारी 2024 या दिवसाची वाट पाहत आहेत. या दिवशी अयोध्येतील भव्य मंदिरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्याला उपस्थित राहता येत नसलं, तरी थिएटरमध्ये याचं थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. पीव्हीआर-आयनॉक्स या देशातील अग्रगण्य थिएटर चेनने हा निर्णय घेतला आहे.

 

यासाठी पीव्हीआरने आज तक या वृत्तवाहिनीशी करार केला आहे. देशभरातील 70 शहरांमधील 160 चित्रपटगृहांमध्ये या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करण्यात येईल.

 

“अशा भव्य ऐतिहासिक घटनांचा अनुभव देखील भव्य असायला हवा. चित्रपटगृहाच्या पडद्यावर हा सोहळा पाहिल्यामुळे तो अधिक जिवंत वाटेल. या सोहळ्याच्या माध्यमातून भाविकांशी जोडलं जाणं हे आमचं सौभाग्य असेल.” असं मत पीव्हीआर-आयनॉक्स लिमिटेडचे को-सीईओ गौतम दत्ता यांनी व्यक्त केलं.”भारताच्या इतिहासातील हा एक बहुप्रतिक्षित क्षण आहे. मंदिरात सुरू असणारा मंत्रजागर, तिथली दृश्ये आणि तिथलं वातावरण हे थिएटरमध्येच लोकांना अनुभवता यावं हा आमचा प्रयत्न असणार आहे. हे मनोरंजन नसेल, तर भाविकांना तो क्षण जगता यावा यासाठीचा प्रयत्न असेल.” असंही ते म्हणाले.

 

अवघे 100 रुपये तिकीट

 

22 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 1 दरम्यान हा सोहळा पार पडणार आहे. यासाठी केवळ 100 रुपयांचं तिकीट आकारलं जाणार आहे. या किंमतीत दर्शकांना पॉपकॉर्न आणि बेव्हरेज कॉम्बो देखील मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -