Tuesday, February 27, 2024
Homeसांगलीमैत्रिणीशी प्रेमसंबंधाचा संशय, युवकाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; संशयितास अटक

मैत्रिणीशी प्रेमसंबंधाचा संशय, युवकाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; संशयितास अटक

 

 

वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा कारखाना परिसरात टायर पंक्चरच्या गाडीवर काम करणाऱ्या नामदेव प्रल्हाद शिंगे (वय ३०, रा. नरसिंहपूर, ता. वाळवा) याचे मैत्रिणीबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून ऊसतोडणीच्या कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला.याप्रकरणी संशयित अक्षय विष्णू शिंदे (रा. जुळेवाडी, ता. कराड, जि. सातारा) याला चिंचणी-वांगी पोलिसांनी अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी अक्षय शिंदे हा त्याच्या मैत्रिणीसह सोनहिरा कारखान्याजवळ असणाऱ्या आदम रज्जाक तांबोळी (रा. अंबक) यांच्या मालकीच्या खोलीमध्ये राहत होता. तर मृत नामदेव शिंगे हा कारखाना परिसरात पंक्चर काढणाऱ्या गाडीवर चालक म्हणून काम करीत होता.

 

नामदेव शिंगे याचे आपल्या मैत्रिणीबरोबर प्रेमसंबंध असल्याचा अक्षय शिंदे याला संशय होता. त्यामुळे त्याचा नामदेववर राग होता. त्यातून त्याने गुरुवारी रात्री ११:३० वाजता नामदेव याच्या तोंडावर, गळ्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. जखमी नामदेव याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच तो मृत झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -