Saturday, July 27, 2024
Homeब्रेकिंगदादागिरीची भाषा करू नका, 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा; जरांगेंचा सरकारला इशारा

दादागिरीची भाषा करू नका, 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा; जरांगेंचा सरकारला इशारा

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) शनिवारी मुंबईच्या (Mumbai) दिशेने निघाले असून, त्यांच्या पायी दिंडीचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, आज निघणाऱ्या पायी दिंडीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा, मुंबईत येऊ नका असे म्हणत दादागिरीची भाषा करू नयेत. त्यांना मराठ्यांची ताकद पहायची असेल, असे म्हणत जरांगे यांनी आज पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला आहे.

यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की,”संविधान हातात घेऊ नयेत, यावर तोडगा कसा काढता येईल, सत्ता येत असते जात असते. मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार आहे. आम्ही आमच्या मागणीवक्र ठाम आहे. आमच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांना मराठ्यांची ताकद पहायची असेल. मराठा समाजाचा हा शेवटचा लढा आहेत. दोन दिवस वाट पाहणार अन्यथा त्यांनी आमच्या गावात येऊ नयेत. मुंबईला येऊ नका असे कसे म्हणतात, दादागिरीची भाषा करू नयेत. 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा,” असा इषारा जरांगे यांनी दिला आहे.

 

मुंबईच्या प्रत्येक गल्लीत मराठे असतील

पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की,”संविधानाने सांगितलं आहे ज्यांच्या शासकीय नोंदी सापडले आहे, त्यांना आरक्षणासह न्याय दिला पाहिजे. हे सरकारचं क्रमप्राप्त असते. फक्त बोलून समाजात रोष निर्माण होईल, यात त्यांचं काय मोठेपण आहे. यावर तोडगा कसा काढता येईल, सत्ता येत असते जात असते.

परंतु, जनतेच्या मनात एखादा माणूस बसला, तर तो कायमचा मनातून उतरत असतो. त्यामुळे यात तोडगा कसा काढता येईल यावर प्रयत्न करायला पाहिजे. त्यांना आणखी देखील सांगत आहे, आम्ही रस्त्याने जरी कमी असलो, तरीही 26 जानेवारीला मराठे मुंबईतून मागे येणार नाही. प्रत्येक गल्लीत मराठे असतील, परत कुणाला पाठवणार, असे जरांगे म्हणाले. आता दोन दिवस वाट पाहू…

मुंबईला जाईपर्यंत तुम्ही निर्णय घ्या, आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत. मात्र, मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, त्यांच्या मुलांना मोठं होऊ द्यायचं नाही यावर सरकार देखील ठाम असल्याचं वाटत आहे. कारण कुणबी नोंदी सापडलेल्या असताना देखील आरक्षण दिले जात नसेल, तर मराठ्यांची ताकद काय आहे हे यांना बघायचं असेल.

नोंदी नसत्या तर मराठ्यांना 200 वर्षे आरक्षण दिलं नसतं हे आता स्पष्ट झाले आहे. फक्त आंदोलन आणि आंदोलनच करायचे हे मराठ्यांच्या वाट्याला आले असते. परंतु, आता नोंदी सापडल्याने त्यांना देखील काही करता येत नाही. आम्ही यांना सात महिन्याचा वेळ दिला यापेक्षा आणखी किती वेळ दिला पाहिजे. मराठा समाजाची यात काय चूक आहे. त्यामुळे आता दोन दिवस वाट पाहू, त्यानंतर त्यांनी देखील आमच्या गावात येऊ नयेत, असे जरांगे म्हणाले.

 

दादागिरीची भाषा करू नयेत.

आम्हाला मुंबईत येऊ नका असे म्हणतात, आम्ही जर म्हटलं त्यांना की तुम्ही मुंबईत येऊ नका तर जमेल का?, मुंबईत येऊ नका असे म्हणणे ही कोणती भाषा आहे. दादागिरीची भाषा करू नयेत. आम्ही तुमच्यावर गुलाल टाकायला येतोय, तुम्ही नशीबवान आहात. काम झाल्यावर लोक विसरून जातात, मात्र तुम्ही भाग्यवान आहात की करोडो मराठे तुमच्यावर गुलाल टाकायला येत आहेत,असे जरांगे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -