Tuesday, February 27, 2024
Homeब्रेकिंगविद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, 22 तारखेबाबतचा महत्त्वाचा निर्णय काय?; परीक्षांचं काय होणार?

विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, 22 तारखेबाबतचा महत्त्वाचा निर्णय काय?; परीक्षांचं काय होणार?

 

 

नुकताच एक अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी पुढे आलीये. विशेष: विद्यार्थ्यांसाठी ही बातमी खूप जास्त महत्वाची आहे. थेट 22 जानेवारी 2024 ला होणारी परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलीये. महाराष्ट्र शासनाने सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दिन असल्याने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यामुळेच सोमवारी होणारी परीक्षा ही आता पुढे ढकलण्यात आलीये.

हेच नाही तर यासोबतच आता परीक्षेची नवीन तारीख देखील जाहिर करण्यात आलीये.मुंबई विद्यापीठाच्या दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या एकूण तब्बल 14 परीक्षा या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नुकताच याबद्दलची घोषणा ही मुंबई विद्यापीठाकडून करण्यात आलीये. या परीक्षा दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी घेण्यात घेणार असल्याचे देखील सांगितले जातंय. तसेच मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या 3 परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

 

22 जानेवारी 2024 रोजी राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा दिन असल्याने सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याने हे बदल करण्यात आले. अगोदर 22 जानेवारी 2024 ही सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली नव्हती. मात्र, अचानक सुट्टी जाहिर करण्यात आली. यामुळे विद्यापीठाने शेवटी यासर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय.

यामध्ये प्रथम वर्ष बीए सत्र एक व प्रथम वर्ष बीकॉम सत्र एक या परीक्षा 22 जानेवारी 2024 ऐवजी 6 फेब्रुवारी 2024 रोजी व एमएमएस सत्र 2 ची परीक्षा 22 जानेवारी ऐवजी 1 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. आता अचानकपणे या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल झाले असल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ होताना दिसतंय.

 

22 जानेवारी 2024 रोजी केंद्र सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आलीये. यामुळे फक्त मुंबई विद्यापीठच नाही तर अनेक विद्यापीठांनी आपल्या परीक्षांच्या तारखेमध्ये मोठे बदल केले आहेत. सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहिर केल्याने आता शाळा, आॅफिसेस, सरकारी कार्यालय वगैरे सर्वकाही बंद राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -