Tuesday, February 27, 2024
Homeराजकीय घडामोडीएकनाथ शिंदे श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत, कारण स्पष्ट करत म्हणाले…

एकनाथ शिंदे श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत, कारण स्पष्ट करत म्हणाले…

भारतात सर्वत्र केवळ राम मंदिराचीच चर्चा आहे. अयोध्येत (उत्तर प्रदेश) नव्याने बांधल्या जात असलेल्या मंदिरात येत्या २२ जानेवारी (सोमवारी) रोजी श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. श्री रामजन्मभूमी ट्रस्टने या दिवशी अयोध्येतील मंदिरात भव्यदिव्य सोहळ्याचं आयोजन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत या तिघांना सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं आहे.

यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, मोठे नेते, कारसेवक, खेळाडू, कलाकार आणि साधू-संतांसह तब्बल ७,००० हून अधिक लोकांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. अयोध्येत या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी चालू आहे. सोमवारी दुपारी १२.१५ ते १२.४५ दरम्यान मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.

 

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, विराट कोहलीपासून ते ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमारपर्यंत अनेक दिग्गज या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, श्री राम जन्मभूमी ट्रस्टने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं आहे. परंतु, एकनाथ शिंदे या सोहळ्याला जाणार नाहीत.

त्यांनी स्वतः एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर याबाबतची माहिती दिली आहे.एकनाथ शिंदे यांनी एक्सवर राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे, जय श्री राम‌‌! अयोध्येत राम मंदीर उभारणीचे कोट्यवधी भारतीय आणि रामभक्त तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साकारलं आहे. यासाठी मोदींचे शतशः आभार. अयोध्येमध्ये सोमवारी श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच.

देशवासियांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्रीरामाचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -