ताजी बातमी ऑनलाइन टीम
दोघा मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून हाणामारीत लाकडी बॅटने केलेल्या हल्ल्यात प्रदीप तेलवेकर (वय 35, रा. शिवाजी गल्ली) याचा खून झाला. त्यानंतर जमावाने केलेल्या मारहाणीत संशयित नीलेश पाटील (28) हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
प्रदीप तेलवेकर व त्याचा मित्र नीलेश पाटील हे दोघे तलावाच्या परिसरात रात्री बोलत बसले होते. दोघांनी भरपूर मद्य प्राशन केले होते.यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. रागाच्या भरात नीलेशने बॅटने प्रदीपला मारहाण सुरू केली. प्रदीपनेही त्याला चोप दिला. दरम्यान, बॅटचा घाव वर्मी बसल्याने प्रदीप जागीच कोसळला. घाबरलेल्या नीलेशने प्रदीपला जखमी अवस्थेत तेथेच सोडून घराकडे धाव घेतली. दरम्यान, प्रदीपचा खून झाल्याची माहिती गावात पसरल्यानंतर संशयित नीलेशचा शोध सुरू झाला. त्याला शोधून जमावाने मारहाण केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
तेलवेकर कुटुंबीयांचा सेंटिंगचा व्यवसाय आहे. वडिलांना तो कामाच्या ठिकाणी मदत करीत असे. कामावरून आल्यावर तो मित्रांसोबत असे.
दरम्यान, घटनास्थळी करवीरचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर व पोलिस फौजफाटा दाखल झाला होता. बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
किरकोळ कारणावरून वडणगेत मित्राचा खून
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -