अयोध्येतील श्रीराम मंदिरात आज दुपारी 12.29 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर पाचशे वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात आली. देशातील कोट्यावधी भाविकांनी घरबसल्या प्रभूरामचे दर्शन घेतले. भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलक पाहिल्यानंतर अनेकांच्या कृत कृत्य झाल्याच्या भावना झाल्या. ‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’ अशा भावना रामभक्तांच्या झाल्या. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी गर्भगृहात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदी बेन पटेल, राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित होते.मंदिर परिसरात विमानातून पुष्पवृष्टी
गेल्या अनेक दिवसांपासून देशवासियांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्रतिक्षा होती. हा सोहळा अनेक अर्थांनी महत्वपूर्ण होता. अयोध्येत सोहळ्यासाठी फक्त निमंत्रितानाच बोलवण्यात आले होते. जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत साधू महंत या सोहळ्यासाठी आले होते. सर्वांनाच हा सोहळा पाहिल्यावर कृत कृत्य झाल्याच्या भावना झाल्या. प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेंकदाचा मुहूर्त 12 वाजून 29 मिनिटांनी होता. यावेळी मंदिर परिसरात विमानातून पुष्पवृष्टी करण्यात आली. शंखनिनाद करण्यात आला. भक्तीमय वातावरणात प्रभू श्रीरामच्या जयघोषात प्राणप्रतिष्ठा झाली.
रामलल्ला यांच्या डोळ्यावरची पट्टी काढली
रघुपती राघव राजा राम म्हणत सोहळा झाला. प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यावर श्रीराम यांच्या मूर्तीचे पहिले दर्शन झाले. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी गर्भगृहात पोहचले त्यांनी प्राणप्रतिष्ठा पूजेसाठी संकल्प केला. त्यांनी रामलल्ला यांच्या डोळ्यावर असणारी पट्टी काढली. कमळाच्या फुलाने पूजन केले. रामलल्ला सुंदर पेहराव केला आहे. पितांबरने सुशोभित असून हातात धनुष्यबाण आहे.यांची होती उपस्थिती
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास देश विदेशातून आलेले प्रमुख अतिथी उपस्थित होते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती व्यंकया नायडू, उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी, गौतम अदाणी, बिग बी अमिताभ बच्चन, रजनीकांत उपस्थित होते. अनेक बॉलीवूड कलाकरांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले.