Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरात कामगार बनून आले,घरफोडी करून गेले..

कोल्हापुरात कामगार बनून आले,घरफोडी करून गेले..

रुईकर कॉलनी येथील घरात (workers) कामा निमित्ताने आलेल्या तरुणांनी धाडसी चोरी केली. पृथ्वीराज धैर्यशील पाटील (वय २९) यांच्या घरातून तीन चोरट्यांनी सुमारे सव्वातीन लाखांचे दागिने चोरून नेले. मंगळवारी ते शुक्रवारच्या (दि. १९) दरम्यान हा प्रकार घडला.शाहूपुरी पोलिसांनी तपास करून (workers) रोहित महेश सावंत (वय २२, रा. सदर बाजार), रोहन अरुण कांबळे (वय २०, मूळ रा. बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली, सध्या रा. सदर बाजार, कोल्हापूर) आणि जस्सी सुधीर चांदणे (वय २३) या तीन संशयितांना अटक केली आहे. कामाच्या निमित्ताने आल्यानंतर तिघांनी घरातील बेडरुममधील सोन्याची अंगठी, रिंगा, बांगड्या, हार, आदी दागिने लंपास केले. याबाबत पृथ्वीराज पाटील यांनी शाहूपुरी पोलीसात फिर्याद दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -