Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंग'बिग बॉस 17’मधून सर्वाधिक चर्चेतल्या स्पर्धकाचा पत्ता कट

‘बिग बॉस 17’मधून सर्वाधिक चर्चेतल्या स्पर्धकाचा पत्ता कट

बिग बॉस 17’ हा शो अंतिम टप्प्यात आला असताना आता सर्वांत मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. यंदाच्या सिझनचं अखेरचं एलिमिनेशन नुकतंच पार पडणार आहे. सध्या बिग बॉसच्या घरात सहा स्पर्धक आहेत. अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, विकी जैन, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी यांच्यापैकी सर्वाधिक चर्चेतला स्पर्धक बिग बॉसचं घर सोडून जाणार आहे. याआधी शोमधून ईशा मालवीय बाहेर पडली होती. त्यानंतर होणारा शेवटचा एलिमिनेशन हा सर्वांसाठीच आश्चर्यकारक ठरणार आहे.

बिग बॉसचा नवीन प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये शेवटच्या एलिमिनेशनबद्दल बोललं जातंय.या प्रोमोमध्ये बिग बॉसच्या आवाजात ऐकू येतंय की, ‘आपण 100 दिवस सोबत घालवले. मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की जो माझ्या शोसाठी चांगला असेल मी त्याच्या बाजूने उभा राहणार. आता जे सहा जण राहिले आहेत, ते सर्वजण या शोसाठी चांगले आहेत. म्हणूनच तुम्हा सहा जणांसोबत हा शेवटचा डाव खेळणार आहे.

आता निर्णयाचा क्षण जवळ आला आहे. सहावरून पाचवर येण्याची वेळ आली आहे.’ यानंतर जे नाव समोर येतं, ते ऐकून बिग बॉसच्या घरातील सर्वच स्पर्धकांच्या चेहऱ्यावरील रंग उडतो.‘द खबरी’ने दिलेल्या वृत्तानुसार, बिग बॉसच्या अखेरच्या आठवड्यात घराबाहेर पडणारा स्पर्धक दुसरा-तिसरा कोणी नसून अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन आहे. यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. अरुण माशेट्टी टॉप 5 मध्ये असणं हा सर्वांत मोठा विनोद आहे, असं एकाने म्हटलंय. तर विकीला टॉप 5 मध्ये असायला हवं असं, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. काही नेटकऱ्यांनी बिग बॉसवर पक्षपातीचा आरोप केला आहे. अंकिताला मुद्दाम सुरक्षित केलं जातंय, असं अनेकांनी म्हटलंय.

 

बिग बॉसच्या पहिल्या एपिसोडपासूनच अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात सतत भांडणं होत आहेत. मात्र या भांडणांना अंकिताही तितकीच जबाबदार असल्याचं मत नेटकऱ्यांनी मांडलं आहे. आता विकीला घराबाहेर काढल्यानंतर त्याचीही मतं अंकिताला मिळणार, अशी टीका प्रेक्षकांनी केली आहे. ग्रँड फिनालेच्या आधी बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विकीने पत्रकारांसमोर गुडघ्यावर बसून पत्नी अंकिताची माफी मागितली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -