Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगआयआयटी किंवा आयआयएम नाही, चक्क ‘या’ विद्यापीठातून शिक्षण घेत विद्यार्थ्याने मिळवले थेट...

आयआयटी किंवा आयआयएम नाही, चक्क ‘या’ विद्यापीठातून शिक्षण घेत विद्यार्थ्याने मिळवले थेट 58 लाखांचे पॅकेज, चक्क..

आयआयटी आणि आयआयएमच्या विद्यार्थ्यांना चांगली पगार मिळते हे नेहमीच सांगितले जाते. हेच नाही तर त्यांचे प्लेसमेंट देखील होते. लाखोंच्या घरात या विद्यार्थ्यांना पॅकेज मिळते. यामुळे प्रत्येकाची इच्छा हीच असते की, आयआयटी आणि आयआयएममध्ये प्रवेश घेण्याची.

थेट विदेशातील कंपनीमध्येही नोकरी करण्याची संधी मिळते. आयआयटी आणि आयआयएममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्याची तयारी पालकांची देखील असते. मात्र, एका विद्यार्थ्याने नुकताच कमाल केलीये. हेच नाही तर त्याचे पॅकेज पाहून सर्वांचेच डोळे चक्रावत आहेत.विशेष म्हणजे आयआयटी आणि आयआयएमच्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक पॅकेज या मुलाला मिळाले आहेत. 25 वर्षांचा अंशु सूद याने पंजाब विश्वविद्यालयात एमबीए केले. थेट कॅंपस प्लेसमेंटमध्ये त्याची निवड झाली आणि त्याला 58.48 लाखांचे पॅकेज मिळाले. विदेशातील एक बड्या कंपनीमध्ये नोकरी करण्याची संधी त्याला मिळाली.

 

अंशु सूद हा पंजाबच्या होशियारपुर येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे त्याला थेट सिंगापुरच्या कंपनीत नोकरी करण्याची संधी मिळाली. सिंगापुरच्या तोलाराम ग्रुपमध्ये सेल्स मॅनेजर या पदावर त्याची निवड झाली आहे. आता लवकरच अंशु सूद हा सिंगापुरसाठी रवाना होईल. सध्या अंशु सूद याचे जोरदार काैतुक केले जातंय.

 

अंशु सूद याने सांगितले की, त्याला 20 लाखांच्या पॅकेजची अगोदरपासूनच अपेक्षा होती. मात्र, त्याला वाटले होते, त्यापेक्षाही अधिक पॅकेज मिळाले. अंशु सूदसाठी या गोष्टी इतक्या जास्त सोप्या नक्कीच नव्हत्या. 2020 ला तो एका कंपनीमध्ये नोकरी करत होता. मात्र, त्यानंतर त्याने एमबीए करण्याचे ठरवले.

 

2020 मध्ये अंशु सूद ज्या कंपनीमध्ये काम करत होता. तिथे त्याला फार कमी पगार असल्याने त्याने एमबीए करण्याचा निर्णय घेतला. अंशु सूद याने सांगितले की, अभ्यासासोबतच तो सतत बातम्या आणि सध्याच्या चालू घडामोडीवर बारीक लक्ष देत असे. याचा फायदा झाल्याचे सांगताना देखील अंशु सूद हा दिसला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -