Monday, October 7, 2024
Homeसांगलीसांगलीतील स्कूलबस ओढ्यात कोसळली, ११ विद्यार्थी जखमी

सांगलीतील स्कूलबस ओढ्यात कोसळली, ११ विद्यार्थी जखमी

आष्टा – मर्दवाडी रस्त्यावरील मिरजवेसजवळ सोमवारी सकाळी येथील क्लेरेमॉट इंटरनॅशनल स्कूलची भरधाव स्कूलबस संरक्षण दगडास धडकून दहा फूट खोल ओढ्यात कोसळली. या अपघातात चालकासह बसमधील 11 विद्यार्थी जखमी झाले. आष्टा पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

प्रियंशी संदीप फडतरे (वय 11, रा.तुंग, ता. मिरज), शरण्या प्रफुल्लकुमार खोत (वय 5, रा. मिरजवाडी, ता. वाळवा), नंदिनी प्रवीणकुमार गायकवाड (वय7, रा.आष्टा), मनस्वी रवींद्र नलवडे (वय7, रा. आष्टा). इतर सात विद्यार्थ्यांना डोक्याला व हातापायांना मुका मार लागला आहे. चालक ओंकार घेवदे व मावशी वैशाली राजेंद्र झिनगे यांनाही हातापायांना मुका मार लागला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बसचालक ओंकार जयवंत घेवदे (रा. अंकलखोप ता. पलूस) स्कूलबस (एम. एच. 10 ए 5094) घेऊन आष्टा- मर्दवाडी रस्त्यावरून भरधाव वेगाने आष्ट्याकडे येत होता. बसमध्ये 11 विद्यार्थी होते. रस्त्यावरील ओढ्याच्या संरक्षण दगडास बसची जोरदार धडक बसली. बस विद्यार्थ्यांसह दहा फूट खोल ओढ्यात कोसळली. चालकासह 11 विद्यार्थी जखमी झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -