Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग45 दिवसाच्या उपचारानंतर जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना डिस्चार्ज, लोक बिरादरी प्रकल्पात...

45 दिवसाच्या उपचारानंतर जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना डिस्चार्ज, लोक बिरादरी प्रकल्पात आनंदी आनंदगडे

गेल्या 45 दिवसांपासून प्रकाश आमटे यांच्यावर उपचार झाल्यानंतर ते आता नागपूरकडे रवाना झाले होते. शुक्रवारी रात्री ते नागपूरला पोहचणार आहेत. शिवाय आगामी काही दिवस ते नागपुरातच मुक्कामी असणार आहे. पूर्णत: विश्रांती करणार असून तब्येतीमध्ये आणखी सुधारणा झाल्यावर ते भामरागड तालुक्यातील लोक बिरादरी प्रकल्पालाकडे जाणार आहेत.ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना (Cancer) कॅन्सर असल्याचे निदान झाल्यापासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 45 दिवसांपासू त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या प्रकृतीमध्ये चढ-उतारही झाले होते. पण या दीड महिन्याच्या काळात पाच कीमोथेरेपी देऊन उपचार सुरु होते.

अखेर शुक्रवारी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधार असल्याने त्यांना (Discharge) डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांचा डिस्चार्ज होताच कुटुंबीय व लोक बिरादरी प्रकल्पाचे स्वयंसेविका यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शुक्रवारी रात्री ते नागपूरला पोहचणार असून काही दिवस ते येथेच विश्रांती घेणार आहेत. त्यानंतर भामरागड तालुक्यातील लोक बिरादरी प्रकल्पालाकडे जाणार आहेत.मुलाने काय दिली माहिती?

प्रकाश आमटे यांचे वय आता 74 एवढे झाले आहे. मध्यंतरी त्यांची तपासणी केली त्यावेळी त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातच उपचार सुरु होते. दरम्यानच्या काळात न्यूमोनिया झाला त्यामुळे तापही वाढला होता. गेल्या 45 दिवसांत त्यांच्यावर पाचवेळेस कीमोथेरेपी करण्यात आली होती. वारंवार ताप येणे, वजन कमी होणे, अति घाम येणे, दम लागणे, हाडांचे दुखणे, त्वचेवर लाल ठिपके येणे असे त्रास जाणवत होते. अखेर त्यांच्यावर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले असून त्यांची तब्येत आता ठिक असल्याने डिस्चार्ज देण्यात आल्याचे मोठा मुलगा अनिकेत आमटे यांनी सांगितले आहे.

नागपूरमध्ये विश्रांती अन् नंतर प्रकल्पालाकडे रवानगीगेल्या 45 दिवसांपासून प्रकाश आमटे यांच्यावर उपचार झाल्यानंतर ते आता नागपूरकडे रवाना झाले होते. शुक्रवारी रात्री ते नागपूरला पोहचणार आहेत. शिवाय आगामी काही दिवस ते नागपुरातच मुक्कामी असणार आहे. पूर्णत: विश्रांती करणार असून तब्येतीमध्ये आणखी सुधारणा झाल्यावर ते भामरागड तालुक्यातील लोक बिरादरी प्रकल्पालाकडे जाणार आहेत. प्रकाश आमटे हे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका अंतर्गत लोक बिरादरी प्रकल्पात जवळपास 40 वर्षांपासून आदिवासी यांची समाजसेवा करीत असून लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमाने नर्सरी ते इंग्लिश मीडियम पर्यंत शाळा, शासकीय आश्रम शाळा,मोठा सार्वजनिक रुग्णालयतुन गोंड माडिया समाजातील लोकांना व अनेक गंरजुना मोफत आरोग्य सेवा जवळपास चाळीस वर्षापासून देत आहेत.तब्येतीमध्ये सुधारणा, विश्रातीचा सल्ला

डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. असे असले तरी काही दिवस तरी त्यांना विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या फोनवर कॉल न करण्याचे आवाहन मुलगा अनिकेत आमटे यांनी केले आहे. शिवाय पूर्णवेळ विश्रांती व्हावी म्हणून आगामी काही दिवस त्यांचा मुक्काम नागपुरातच राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -