Thursday, July 24, 2025
Homeब्रेकिंगबजेटमध्ये कोणाला लागणार लॉटरी, मागील बजेटमध्ये मिळाली होती ही भेट

बजेटमध्ये कोणाला लागणार लॉटरी, मागील बजेटमध्ये मिळाली होती ही भेट

आजपासून संसदेचे आर्थिक अधिवेशन सुरु होत आहे. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अंतरिम बजेट सादर करतील. गेल्यावर्षीच्या त्यांनी अर्थसंकल्प सादर केला तेव्हा त्याला ‘अमृत काल’ बजेट म्हटल्या गेले. या बजेटमध्ये सरकारने अनेक गिफ्ट दिले होते, या बजेटकडून पण अनेक अपेक्षा आहेत.तुम्हाला गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पाचे भाषण लक्षात आहे का? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात या बजेटला अमृतकालचे पहिले बजेट म्हटले होते. या अर्थसंकल्पात आयकरात मोठा बदल आला. तर महिलांसाठी काही योजना सुरु करण्यात आल्या. त्यांच्यासाठी महिला सन्मान निधी ही बचत योजना आणण्यात आली. त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांसाठी आणि शेत मजूरांसाठी पण बऱ्याच तरतूदी करण्यात आल्या. या बजेटमध्ये पण खास गिफ्ट मिळण्याची अपेक्षा आहे.गेल्यावर्षी काय केली होती घोषणा

गेल्यावर्षी निर्मला सीतारमण यांनी सर्वसामन्य लोकांसाठी न्यू इनकम टॅक्समध्ये मोठी सवलत दिली होती. गेल्या वर्षी नवीन कर व्यवस्थेत करदात्यांना 7 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न कर मुक्त करण्यात आले होते. याशिवाय 50,000 रुपयांपर्यंतची मानक वजावट, स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा दिला होता. त्यामुळे करदात्यांना 7.5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त झाले होते.

महिलांसाठी पण सरकारने विशेष घोषणा केली होती. महिलांचा बचतीचा कल पाहता, त्यांच्यासाठी खास योजना आणण्यात आली. खास महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेत दोन वर्षांसाठी दोन लाखांपर्यंत रक्कम जमा करण्याची मुभा देण्यात आली आहे. या रक्कमेवर 7.5 टक्क्यांचे व्याज देण्याची तरतूद करण्यात आली आहे.पायाभूत सोयी-सुविधांवर, इन्फ्रास्ट्रक्चरवर जवळपास 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. ‘श्री-अन्न’, शेतकऱ्यांसाठी सेंद्रीय शेती आणि ‘पीएम-प्रणाम’ योजना सुरु करण्यात आली. कृषी क्षेत्रासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी कृषी क्षेत्रात स्टार्टअपसाठी फंड आणि 2516 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह 63,000 पीएसीएसचे संगणकीकरण आणि साठवणूक क्षमतेवर भर देण्यासाठी तरतूद करण्यात आली.

कृषी क्षेत्रात कर्ज वाटपाचे लक्ष्य 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आले. तर 6,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पीएम मत्स्य संपदा योजनेतंर्गत एक नवीन योजना सुरु करण्यात आली. आता या बजेटमध्ये महिला शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद होऊन, वार्षिक 12-15000 रुपये वार्षिक निधी मिळण्याची तरतूद होऊ शकते.GYAN वर फोकस

केंद्र सरकार या बजेटमध्ये गरीब, युवा, किसान आणि महिला GYAN वर फोकस करणार आहे. या चार जाती असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. लोकसभा निवडणुका आता तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यात महिलांची लोकसंख्या अर्धी आहे. महिला वर्गाला भाजपकडे वळविण्यासाठी केंद्र सरकार गेल्या काही वर्षांपासून अधिक लक्ष देत आहे. त्यामुळेच या चार वर्गासाठी बजेटमध्ये खास घोषणा होऊ शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -