Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगराज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा सर्वेक्षणाची अंतिम आकडेवारी समोर; 95 टक्के कुटुंबांचं सर्वेक्षण...

राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा सर्वेक्षणाची अंतिम आकडेवारी समोर; 95 टक्के कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण

राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या मराठा सर्वेक्षणाची (Maratha Survey)अंतिम आकडेवारी आता समोर आली आहे. या सर्वेक्षणात राज्यातील (Maharashtra) तब्बल 95 टक्के कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झालं आहे.गोखले इनस्टिट्यूटने केलेल्या या सर्वेक्षणात तब्बल 1 हजार जीबीचा डेटा संकलित झाला आहे. राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाचे सर्वेक्षण झालं असल्याने त्यातून समाजाची सध्याची आर्थिक तसेच शैक्षणिक परिस्थिती नेमकी कशी आहे हे समजण्यास मोठी मदत होईल असं राज्य महामार्ग आयोगामार्फत सांगण्यात आलं आहे.

2 कोटी 48 लाख 24 हजार 151 कुटुंबांचं सर्वेक्षण आतापर्यंत पूर्ण

राज्य मागासवर्ग आयोगाने केेलेल्या या सर्वेक्षणात एकूण 2 कोटी 48 लाख 24 हजार 151 कुटुंबांचं सर्वेक्षण आतापर्यंत पूर्ण झालं आहे. गोखले इनस्टिट्यूटच्या अंतर्गत हे सर्वेक्षण घेण्यात आलं आहे. या सर्वेक्षणात आतापर्यंत तब्बल 1 हजार जीबीचा डेटा संकलित झाला असून त्याचे विश्लेषण केल्यावरच आठवड्याभराने गोखले इनस्टिट्यूट मागासवर्ग आयोगाला मराठा सर्वेक्षणासंबंधीचा अंतिम अहवाल सादर करणर असं सांगण्यात आलं आहे.

आयोगामार्फत करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातून मराठा समाजाची एकूण लोकसंख्याही अप्रत्यक्ष मोजली जाणार आहे. राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावरमराठा समाजाचे सर्वेक्षण झालं असल्याने त्यातून समाजाची सध्याची आर्थिक तसेच शैक्षणिक परिस्थिती नेमकी कशी आहे हे समजण्यास मोठी मदत होईल आणि आकडेवारीच्या आधारेच मराठ्यांचे सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल असं सांगण्यात आलं आहे.

पुणे शहरात 1 लाख 84 हजार 701 कुटुंबांनी सर्वेक्षण नाकारलं

राज्य मागासवर्ग आयोगाच्या या सर्वेक्षणाला जरी चांगला प्रतिसाद मिळत असला तरी मात्र, पुणे शहरात 1 लाख 84 हजार 701 कुटुंबांनी सर्वेक्षण नाकारले. तर, 3 लाख 93 हजार 819 घरं सर्वेक्षणावेळी बंद आढळून आली. पुणे मनपा हद्दीत एकूण 14 लाख 30 हजार 62 घरांचे सर्वेक्षण झालं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -