इचलकरंजी, ता. २९-शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाइन आर्थिक फसवणुकीला बळी पडलेल्या तक्रारदारांना पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. एनसीसीआरपी व डायल १९३० क्रमांकावर प्राप्त तक्रारीच्या आधारे ३ लाख ३० हजार रुपयांची रक्कम गोठविण्यात आली होती. ही संपूर्ण रकम सायबर पोलीस ठाणे व शिवाजीनगर पोलिसांच्या प्रयत्नातून तक्रारदारांना परत मिळवून देण्यात आली.
अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस अंमलदार मनोहर राऊत यांनी एनसीसीआरपी पोर्टलवरील तक्रारीचा पाठपुरावा केला, तक्रारपैिकी ३ लाख ३० हजार रुपयांची रक्कम गोठविण्यात आली होती. सायबर पोलीस ठाणे व शिवाजीनगर पोलिसांच्या समन्वयातून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ही रकम संबंधित तक्रारदारांना परत मिळवून देण्यात आली.
