Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगसंतापजनक! पोटच्या मुलीवर बापाची नियत फिरली; १४ वर्षांची मुलगी ७ महिन्यांची गर्भवती...

संतापजनक! पोटच्या मुलीवर बापाची नियत फिरली; १४ वर्षांची मुलगी ७ महिन्यांची गर्भवती राहिली

40 वर्षीय नराधम दारुड्या बापाने आपल्या पोटच्या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मुलगी (pregnant) गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आलाय.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.बीड जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. प्रत्येक मुलगी आपल्या आयुष्यातील रिअल हिरो म्हणून आपल्या वडिलांकडे पाहते. मात्र एका 40 वर्षीय नराधम दारुड्या बापाने आपल्या पोटच्या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

मुलगी (pregnant) गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या धारूर तालुक्यातील ही धक्कादायक घटना घडली आहे. नराधम व्यक्ती गावात उसतोड मजूर म्हणून काम करतो.

त्याने आपल्या 14 वर्षांच्या मुलीवर दारु पिऊन वारंवार अत्याचार केला. पीडितेच्या पोटात दुखायला लागल्यानंतर तिने अंबाजोगाईच्या रुग्णालयात तपासणी केली.त्यानंतर ती 7 महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले. आईने तिला विश्वासात घेऊन विचारल्यावर तिने आपल्या बरोबर घडलेल्या क्रूर कृत्याबद्दल आईला सांगितले.

आईला हे समजताच तिच्या पायाखालची जमिनीच सरकली. आईने प्रचंड संताप व्यक्त केला. तसेच आपल्या पतीला धडा शिकवायचा आणि मुलीला न्याय मिळवून द्यायचा असं तिने ठरवलं. पीडितेच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात बापाविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -