Wednesday, February 5, 2025
Homeब्रेकिंगमहिलेवर सामूहिक बलात्कार करून लग्नासाठी कर्नाटकात विकलं

महिलेवर सामूहिक बलात्कार करून लग्नासाठी कर्नाटकात विकलं

पुणे जिल्ह्यातील (marriage) विवाहित तरुणीवर मिरज व जमखंडी येथे सामूहिक बलात्कार करून तिची कर्नाटकात चार लाखांना विक्री केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी येथील गांधी चौक पोलिस ठाण्यात तीन महिलांसह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मिरजेतील सात जणांना अटक करण्यात आली आहे.

पतीसोबत भांडणानंतर सासर सोडून मिरजेत आलेल्या २३ वर्षीय महिलेवर पाचजणांनी सामूहिक बलात्कार केला.

याप्रकरणी ११ जणांविरोधात येथील महात्मा गांधी पोलिस चौकीत गुन्हा दाखल झाला आहे.

 

पतीसोबत भांडणानंतर सासर सोडून मिरजेत आलेल्या २३ वर्षीय महिलेवर पाचजणांनी सामूहिक बलात्कार करून तिला (marriage)लग्नासाठी निर्दयीपणे तिला कर्नाटकात नेऊन चार लाखांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.संबंधित खरेदीदार महिलेने तिचा व्यवहार करून परस्पर लग्न लावून दिले. याप्रकरणी ११ जणांविरोधात येथील महात्मा गांधी पोलिस चौकीत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संबंधित महिलेसह आत्तापर्यंत सातजणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या प्रकरणी महम्मदहुसेन महम्मदगौस शेख (वय ३१), अबुजर फारुख जमादार (वय १८), महंम्मद साजिद शमशुद्दीन मुल्ला (वय २०), खालीद मुबारक कोरबू (वय २०), जुबेर ऊर्फ कपाला शब्बीर शेख (वय २४), महम्मदगौस ऊर्फ सरफू शेरखान फकीर (वय २२), संतोषी बाबू नाशिककर (लग्नानंतरचे नाव इरम महम्मदगौस फकीर, वय २६) (सर्व रा. ख्वॉजा वस्ती मिरज) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यासह गंगा आणि मुक्ता नामक दोन महिला, अण्णा नामक एक व्यक्ती आणि कर्नाटकात लग्न लावून दिलेला ब्रातेश (रा. जमखंडी) अशा ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नराधमांपैकी मिरजेतील ख्वॉजा वस्तीतील एकाचे नेमके नाव पीडितेला ज्ञात होते. मिरजेतील तपासाधिकारी निरीक्षक सुधीर भालेराव त्या नावावरून सर्व आरोपींपर्यंत पोहचले. पोलिस तपासात सर्व सीसीटीव्ही फुटेज व मोबाईल कॉल लोकेशन जुळत असल्याने पीडितेच्या बोलण्यात तथ्य असल्याचे स्पष्ट होताच गतीने कर्नाटकपर्यंत पोलिसांनी माग काढत सर्व सूत्रे जुळवली. लवकरच उर्वरित आरोपींनाही गजाआड केले जाईल, असे श्री. भालेराव यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -