Tuesday, December 24, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजीत सायझिंग सुरू : प्रदुषण मंडळाकडून क्लोजर नोटीसा मागे : वस्त्रोद्योगातून समाधान

इचलकरंजीत सायझिंग सुरू : प्रदुषण मंडळाकडून क्लोजर नोटीसा मागे : वस्त्रोद्योगातून समाधान

प्रदूषण मंडळांनी क्लोजर नोटीसा मागे घेत असल्याचे सांगितल्यानंतर इचलकरंजीत सायझिंग आता सुरू होत आहे. यामुळे वस्त्रोद्योगात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रदुषणाचा कारणावरून चार सायझिंगचा विद्युत पुरवठा प्रदूषण नियंत्रण मंडळाने तोडला होता. त्यांची वीज जोडणी पूर्ववत सुरु करून देण्याबरोबरच क्लोजर नोटीसा मागे घेत सायझिंग सुरु करण्यास सशर्त परवानगी दिली आहे.

त्यामुळे मागील सात दिवस सुरू असलेला संप सायझिंग असोशिएशनने मागे घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे गुरुवारपासून पुन्हा सायझिंग उद्योग सुरू झाल्याने शहरातील वस्त्रोद्योग पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे.बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

प्रदुषणाच्या कारणावरून प्रदुषण नियंत्रण मंडळाने शहरातील पाच सायझिंगांना क्लोजरची नोटीस बजावली आहे. तर चार सायझिंगचा वीज पुरवठा तोडला होता. जे उद्योग प्रदुषणास कारणीभूत ठरत आहेत त्यांच्यावर कारवाई न करता पाणी प्रदुषणामध्ये सायझिंग व्यवसायाचा नगण्य सहभाग असताना त्यांच्यावर कारवाई करत दुजाभाव केला जात असल्याने सायझिंग असोसिएशनने प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून जोपर्यंत सायझिंग रिस्टार्टचा निर्णय जाहीर करीत नाही तोपर्यंत सायझिंग बेमुदत यामध्ये सायझिंग बंद कोटीची साडेचार संदर्भात नियंत्रण बैठक आणि शहर परिसरातील सुमारे १५० ९ फेब्रुवारीपासून बेमुदत ठेवण्यात आल्या होत्या.

या आंदोलनामुळे दररोजी २५ ते ३० उलाढाल ठप्प होण्यासह हजाराहून अधिक कामगार कामापासून वंचित राहिले होते. या चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मुंबई येथील प्रदुषण मंडळाच्या कार्यालयात झाली होती. या बैठकीत सायझिंगधारकांकडून घेतलेला दंड त्यावरील व्याज परत देण्याबरोबर सायझिंग रिस्टार्ट

करण्यासदंर्भात सकारात्मक निर्णय झाला होता. मात्र जोपर्यंत प्रदुषण नियंत्रण मंडळ लेखीस्वरुपात देत नाही तोपर्यंत सांयझिंग बंद ठेवण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला होता.

अखेर प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून बुधवारी रात्री असोसिएशनला बंद केलेल्या सायझिंग सुरू करण्याबाबत सशर्त परवानगी देत असल्याचे पत्र मिळाले आहे. त्यानुसार गुरूवारी सकाळपासून आंदोलन मागे घेत असल्याचे असोसिएशनने जाहीर केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -