Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानWhatsApp ला टक्कर देण्यासाठी स्वदेशी पर्याय, DRDO ने पास केले हे अ‍ॅप

WhatsApp ला टक्कर देण्यासाठी स्वदेशी पर्याय, DRDO ने पास केले हे अ‍ॅप

प्रत्येक भारतीयांच्या हातात आता मोबाईल आहे. स्मार्टफोन असणाऱ्या सर्वांकडे विविध प्रकारचे अ‍ॅप आहेत. त्यात व्हॉट्सअ‍ॅप हे अ‍ॅप सर्वांसाठी आवश्यक बनले आहे. मार्क झुकेरबर्ग यांची मालकी असणाऱ्या व्हॉट्सॲप सध्या जगभरात 2.7 अब्जापेक्षा जास्त लोक वापरत आहेत. भारतात 53 कोटींपेक्षा जास्त व्हॉट्सॲपचे युजर आहेत. हे ॲप आयफोन, अँड्रॉईड, विंडोज फोन इत्यादी सर्व आघाडीच्या स्मार्टफोनवर उपलब्ध आहे.

काही वर्षांपूर्वी व्हॉट्सॲपला स्वदेशी पर्याय शोधण्यासंदर्भात चर्चा सुरु झाली होती. आता तो पर्याय समोर आला होता. आता व्हॉट्सॲपला पर्याय असणाऱ्या स्वदेशी संवाद (Samvad) ॲपसंदर्भात महत्वाची बातमी आली आहे. संवाद ॲपच्या सुरक्षा चाचण्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO ) केल्या आहे. या ॲपला Trust Assurance Level(TAL) 4 मान्यता दिली आहे.DRDO कडून या ॲपच्या टेस्ट पूर्ण

सेंटर फॉर डेव्हलमेंट ऑफ टेलीमॅटिक्स या संस्थेने विकसित केलेले हे ॲप आहे. त्याचा वापर iOS आणि Android दोन्ही प्लेटफॉर्मवर करता येणार आहे. DRDO ने या ॲपच्या टेस्ट पूर्ण केल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. परंतु अधिकृतरित्या हे ॲप लॉन्च अजून झालेले नाही. या ॲपचे वेब व्हर्जन सध्या सुरु आहे. संवादचे वेब व्हर्जन CDoT च्या वेबसाइटवर जाऊन एक्सेस करता येतो. त्यासाठी तुम्हाला साइनअप करावे लागणार आहे. परंतु अजून हे व्हर्जन सर्वसामान्य लोकांसाठी सुरु केले गेले नाही.संवादमध्ये काय आहेत फिचर्स

CDoT च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सॲपप्रमाणे असणाऱ्या या ॲपवर अनेक फिचर्स दिले आहेत. त्यात युजर्सला वन ऑन वन आणि ग्रुप मैसेजिंग करता येणार आहे. तसेच युजर्स कॉलिंग करु शकणार आहे. व्हॉट्सॲपचे लोकप्रिय ठरलेले फिचर्स स्टेटस यामध्ये आहे.

या ॲपवर फोटो, व्हिडियो, डॉक्यूमेंट्स, कॉन्टैक्ट, लोकेशन आणि दुसरे डिटेल्स शेअर करण्याचे ऑप्शन असणार आहे. या ॲपवर व्हॉट्सॲप प्रमाणे मेसेज रीड आणि रिसीव्ह झाल्यानंतर टिक मार्क दिसणार आहे. युजर्सच्या एक्सटर्नल ॲपवर मीडिया शेअरिंग, फिल्टर्ड न्यूज, ब्रॉडकास्ट लिस्ट सारखे फिचर्स मिळणार आहे. संवाद ॲप कधीपासून येणार आहे, त्याची माहिती संरक्षण आणि संशोधन विकास संस्थेने दिली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -