Saturday, July 27, 2024
Homeराजकीय घडामोडीकुटुंबाने एकटं पाडल्याचा अजितदादाचा दावा; शरद पवार यांचं एकाच वाक्यात उत्तर काय...

कुटुंबाने एकटं पाडल्याचा अजितदादाचा दावा; शरद पवार यांचं एकाच वाक्यात उत्तर काय ?

बारामतीमधील अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यादरम्यान बोलताना अजित पवार यांनी आपल्याला परिवारात एकटं पाडण्यात आल्याची भावना व्यक्त केली. त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार यांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया अखेर समोर आली आहे. ‘ संपूर्ण लोकं एका कुटुंबाच्या मागे आहेत आणि मीच एकटा आहे, हे भासवण म्हणजे लोकांना भावनिक करून त्यांची सहानुभूती मिळवण्याचं काम आहे ‘ अशा शब्दांत शरद पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला.

राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवार आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये आहेत. दुपारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक मुद्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांवरही टीका केली. पक्ष, चिन्ह काढून घेणे हा आमच्यावर अन्याय आहे. पक्ष आणि चिन्हाबाबतचा निर्णय सेटलमेंट करून घेतला गेला, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

बारामतीचे लोक आम्हाला ओळखतातआम्ही भावनात्मक अपील करण्याचं कारण नाही. कारण बारामतीचे लोक आम्हाला वर्षानुवर्ष ओळखत आहेत. त्यामुळे आम्हाला भावनात्मक अपील करण्याची गरज नाही. पण विरोधकांकडून ज्या पद्धतीने भाषा वापरली जाते, त्यांची भाषणं पाहता बारामतीचे लोक नोंद घेतील.

लोकांची सहानुभूती मिळवण्याचं काम

बारामतीमध्ये एकटं पाडलं जातंय या अजित पवारांच्या विधानाचाही समाचार घेतला. ‘ उमेदवार कोणी असा तरी निवडणुकीत मतदारांची साथ मागण्याचा अधिकार त्याला आहे. पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या मागे आहेत, आणि मीच एकटा आहे, असं भासवणं म्हणजेच लोकांना भावनिक करण्यासारखं आहे. लोकांची सहानुभूती मिळवण्याचं काम आहे ‘ असे शरद पवार म्हणाले.

माझ्या कानावर बऱ्याच गोष्टी आल्या आहेत. अनेक कार्यकर्त्यांना धमकावलं जातंय. त्यांना टेलिफोन येत आहे. मी तुला पदावर बसवलं असं सांगितलं जातं, दमदाटी केली जाते. या सर्व गोष्टी बारामतीत नव्हत्या. पहिल्यांदाच हे पाहायला मिळत आहे, असे ते म्हणाले.

बारामतीच्या सभेची तारीख अजून ठरवलेली नाही. त्या सभेला अद्याप अवकाश आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले होते अजित पवार ?

अजित पवार गटाचा बूथ कमिटी मेळावा पार पडलाय त्या मेळाव्यात कार्यकर्त्यांसमोर बोलताना अजित पवार भावनावश झाले. ते म्हणाले, ” बारामतीमध्ये आता ते एकमेव वरिष्ठ आहे. दुसरे वरिष्ठ पुणे शहरात आहेत. बारामतीमध्ये मी आणि माझा परिवार सोडला तर सर्व जण माझ्या विरोधात प्रचार करतील. मला एकटे पाडण्याचा प्रयत्न काही जण करतील. घरातील सर्व माझ्या विरोधात गेले.

तरी हे तुम्ही सर्व माझ्याबरोबर आहात. तुमची साथ आहे, तुमचा पाठिंबा आहे. तुमची एकजूट आहे. तोपर्यंत माझे काम असेच चालत राहणार आहे. काही जण तुम्हाला भावनिक होऊन तुमच्यासमोर येतील. परंतु भावनेने काम होत नाही. प्रश्न सुटत नाही. रोजगार मिळत नाही. त्यासाठी तडफ लागते.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -