Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगराजा शिवाजी' रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची नवी कलाकृती, छत्रपतींच्या भूमिकेत स्वत:...

राजा शिवाजी’ रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची नवी कलाकृती, छत्रपतींच्या भूमिकेत स्वत: रितेश दिसणार? नवं पोस्टर आलं समोर

अभिनेता रितेश देशमुख (Riteish deshmukh) याने नुकतच त्याच्या नव्या चित्रपटाची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) हा रितेश देशमुख दिग्दर्शित चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेया चित्रपटाचं एक नवं पोस्ट नुकतचं रितेशने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. मुबंई फिल्म कंपनी आणि जिओ स्टुडिओ यांची निर्मिती असून स्वत: रितेश देशमुख याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. पण या पोस्टवरुन महाराजांच्या भूमिकेत नेमकं कोण दिसणार की रितेश स्वत: छत्रपतींची भूमिका साकारणार याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

 

रितेश आणि जेनिलिया या दोघांनीही या चित्रपटासंदर्भात पोस्ट केली आहे. या दोघांच्या या पोस्टमुळे पुन्हा एका शिवरायांच्या इतिहास हा मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तसेच या चित्रपटात कोणती स्टारकास्ट असणार याबाबत देखील प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. या चित्रपटातील संगीताची जबाबदारी अजय-अतुल यांनी पेलवली आहे. तसेच ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी निर्मिती केलीये. या चित्रपटाचे छायांकन संतोष सिवन यांनी केलंय. तसेच हा चित्रपट मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.

 

रितेशने पोस्टमध्ये काय म्हटलं?

 

इतिहासाच्या गर्भात, एक अशी आकृती जन्माला आली जीचं अस्तित्व नश्वरतेच्याही पल्याड होतं. एक प्रतिमा, एक आख्यायिका, जे धगधगत्या प्रेरणेचं चिरंतन अग्नीकुंड होतं. छत्रपती शिवाजी महाराज.. फक्त इतिहासपुरुष नाहीत. ती एक भावना आहे, असामान्य शौर्याचा पोवाडा आहे, साडे तिनशे वर्षांपासून.. प्रत्येकाच्या मनामनात उगवणारा आशेचा एक महासूर्य आहे.शिवरायांची महागाथा भव्य पडद्यावर जिवंत करता यावी अशी आमची दुर्दम्य महत्वाकांक्षा होती.

एका प्रतापी पुत्राच्या महागाथेचा प्रवास ज्याने एका महाकाय सत्तेला उलथवत आणि स्वराज्याचा धगधगता वणवा पेटवला. एक रणधुरंधर, जिथे शौर्याला सिमा नाही. ज्यांनी जमिनींवर नाही रयतेच्या मनामनांवर राज्य केलं …आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मुखी ज्यांचं नाव आहे….’राजा शिवाजी’, अशी पोस्ट रितेशने केली आहे.जेनेलियानेही केली पोस्ट

 

तसेच जेनेलियाने देखील पोस्ट करत या चित्रपटाविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. तिने म्हटलं की, गेली कित्येक वर्ष आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांवरचा चरित्रपट पडद्यावर साकारता यावा हे स्वप्न उराशी बाळगून होतो.हे शिवधनुष्य पेलतांना एक भव्य चित्रपट साकारावा फक्त इतकाच हेतू नाही. हे एक असं राजवस्त्राचं नाजूक वीणकाम आहे ज्यात आपल्या इतिहासाची भव्यता आणि आपल्या संस्कृतीची समृद्धता आहे.‘राजा शिवाजी’ हे आमचं सगळ्यात मोठं स्वप्न.

हे साकारत असतांना, ज्यांना अद्वितीय कामं करण्याचा ध्यासच आहे असे ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडीओ आमच्या साथीला आहेत. याहून सक्षम साथ असुच शकत नव्हती. शिवगाथा सांगणं हा आमच्यासाठी सन्मान तर आहेच पण त्याहून मोठी जबाबदारी आहे ह्याची आम्हाला नम्र जाणीव आहे. आजच्या पवित्र दिनी आई जगदंबा , छत्रपती शिवरायांना वंदन करून आम्ही तुमच्या शुभेच्छा पाठीशी असतील अशी आशा करतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -