Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रझोमॅटो देणार ॲमेझॉन फ्लिपकार्टला टक्कर; काय आहे कंपनीचा प्लॅन?

झोमॅटो देणार ॲमेझॉन फ्लिपकार्टला टक्कर; काय आहे कंपनीचा प्लॅन?

ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म(Amazon) झोमॅटो आपल्या 10 मिनिटांच्या डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ब्लिंकिटचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. इकॉनॉमिक ब्लिंकिटमध्ये विविध उत्पादने जोडणार आहे.

 

कंपनीचा विस्तार करून, Zomato थेट Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांशी स्पर्धा करू शकते(Amazon). झोमॅटो स्वतःची पुरवठा साखळी तयार करण्याची योजना आहे. डायरेक्ट-टू-कंझ्युमर (D2C) क्षेत्रातील ही वाटचाल कंपनीसाठी दीर्घकालीन वाढ म्हणून पाहिली जात आहे.

 

झोमॅटोने या धोरणाचा भाग म्हणून किमान दोनदा ई-कॉमर्स एनेबलर, शिप्रॉकेट विकत घेण्याचा आणि विलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. अहवालानुसार, ShipRocketने विलीनीकरणाची ऑफर नाकारली.Zomato ने एक्सचेंजेसला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने वार्षिक आधारावर (YoY) 138 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. तर कंपनीला मागील वर्षीच्या याच कालावधीत (FY23Q3) 347 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता.

 

सप्टेंबर तिमाहीत (FY24Q2), कंपनी तोट्यातून सावरली आणि 36 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. त्याचवेळी, चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल 69 टक्क्यांनी वाढून 3,288 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर एका वर्षापूर्वी याच कालावधीत (FY23Q3) ते 1,948 कोटी रुपये होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -