सुळकूड योजना कार्यान्वित करण्यासाठी इचलकरंजीत महिलांचे आमरण उपोषण
इचलकरंजी /ताजी बातमी टीम
इचलकरंजी शहरासाठी अमृत २ अंतर्गत मंजूर सुळकूड उद्भव दुधगंगा पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी या मागणीसाठी ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ या महिला गटाच्या श्रीमती सावित्री हजारे, शोभा इंगळे, सुषमा साळुंखे व ज्योत्स्ना मिसे या चार महिलांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.
राशिभविष्य : मंगळवार दि. 20 फेब्रुवारी 2024
महात्मा गांधी पुतळा चौकामध्ये सुरु असलेल्या या उपोषणास अनेक मान्यवरांनी भेट देत जाहीर पाठिंबा दिला.
आम्ही सावित्रीच्या लेकी वा महिला गटातील महिला व समन्वय समितीमधील प्रमुखांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्या महिलांच्या हस्ते शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास आणि महात्मा गांधी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर चौकात उपोषणास प्रारंभ करण्यात आला. शिवजयंतीचे विविध कार्यक्रम असूनही शहरातील नागरिक व विशेषतः महिला भगिनी या उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी मोठ्या संख्येने येत होत्या. महिला गटाने पाण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी विविध मान्यवरांनी भेट देऊन पाठींबा दिला.