Sunday, September 8, 2024
Homeबिजनेसविमा पॉलिसी नाही आवडली तर करा की परत! 30 दिवसांची मिळणार ट्रायल...

विमा पॉलिसी नाही आवडली तर करा की परत! 30 दिवसांची मिळणार ट्रायल : Insurance

Insurance | विमा पॉलिसी नाही आवडली तर करा की परत! 30 दिवसांची मिळणार ट्रायल

केंद्र सरकार अमुलाग्र बदल करण्याच्या तयारीत आहे. अनेक सोयी-सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तर ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी बदल होत आहे. आता ग्राहकांना, त्याला न आवडलेली विमा पॉलिसी परत करता येणार आहे. वाहन खरेदीपूर्वी ट्रायल घेण्यात येते. त्याच धरतीवर ग्राहक विमा पॉलिसी ट्रायलवर खरेदी करु शकतो. ग्राहकांना विमा कंपनी भूलथापा देत असल्याचे लक्षात आल्यास पॉलिसी परत करण्याविषयीचा यापूर्वीचा नियम सोपा करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) प्रस्ताव ठेवला आहे. प्रस्ताव मंजूर झाला तर 15 दिवसांचा सध्याचा कालावधी वाढून तीस दिवसांचा होईल.

इरडाने यासाठी एक ड्राफ्ट तयार केला आहे. यामध्ये विम्यासंबंधीत विविध नियमांना एकत्रित करण्याची वकिली करण्यात आली आहे. या नवीन प्रस्तावात ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी विमा पॉलिसी ट्रायलची संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यानुसार, फ्री लूकसाठी 30 दिवसांचा प्रस्ताव ठेवला आहे.म्हणजे विमा पॉलिसी सुरु झाल्यापासून ते पुढील तीस दिवसांत ग्राहकांना पॉलिसी न आवडल्यास ती परत करता येईल.

विमा नियामक इरडाने पॉलिसी परत घेण्यासाठी निश्चित यापूर्वीचा 15 दिवसांचा कालावधी आता 30 दिवसांपर्यंत वाढवला आहे. तर जीवन विमा पॉलिसीसाठी नामांकन अनिवार्य करण्याचा बुधवारी प्रस्ताव सादर केला. सध्याच्या विमाधारकाला पॉलिसीचे नियम व अटी योग्य वाटल्या नाही, अथवा विमा पॉलिसी योग्य न वाटल्यास ती परत करता येऊ शकते. इलेक्ट्रॉनिक पॉलिसी प्रकरणात आता कालावधी वाढवून तो 30 दिवसांचा करण्यात आला आहे.

तर करा परत पॉलिसी

तुम्ही कंपनीकडून विमा पॉलिसी खरेदी केली

त्यातील एखादी अट वा शर्त तुम्हाल खटकली

या पॉलिसीत जास्त फायदा दिसला नाही

भविष्यासाठी त्यातील गुंतवणूक फायदेशीर वाटली नाही

तर सध्या ही पॉलिसी 15 दिवसांत परत करता येते

नवीन प्रस्तावानुसार हा कालावधी 30 दिवसांचा करण्यात येईल

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -