Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगस्टंट करताना धाडकन पडली नोरा फतेही, व्हिडीओ व्हायरल

स्टंट करताना धाडकन पडली नोरा फतेही, व्हिडीओ व्हायरल

नोरा फतेही (stunt) आणि विद्युत जामवाल लवकरच त्यांचा आगामी चित्रपट ‘क्रॅक’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या २३ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. सध्या नोरा आणि विद्युत या चित्रपटाच्या प्रमोशमध्ये व्यस्त आहे. बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही सध्या चर्चेत आली आहे.

नोरा फतेहीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. स्टंट (stunt) करताना नोरा फतेही जमिनीवर धाडकन पडली. नोराचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला. नोरा फतेही यावेळी अभिनेता विद्युत जामवालसोबत स्टंट करत होती. नोरा फतेही आणि विद्युत जामवाल लवकरच त्यांचा आगामी चित्रपट ‘क्रॅक’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हा चित्रपट येत्या २३ फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.सध्या नोरा आणि विद्युत या चित्रपटाच्या प्रमोशमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये नोरा फतेही विद्युत जामवालसोबत जबरदस्त स्टंट करताना दिसणार आहे. या चित्रपटातील बरेच स्टंट (stunt) नोरा फतेही स्वत:च करताना दिसणार आहे.

या चित्रपटाच्या शूटिंगवेळी विद्युतसोबत स्टंट करताना नोरा फतेही जमिनीवर जोरात पडली. नोरा फतेहीने स्वत:च आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नोरा फतेही आणि विद्युत जामवाल पायामध्ये रोलर स्केट्स घालून स्टंट करताना दिसत आहे.

विद्युतने नोराला एका रस्सीच्या सहाय्याने बांधले आहे. विद्युत पुढे स्केटिंग करताना दिसत आहे. तर त्याच्या मागे नोरा देखील स्केटिंग करत येताना दिसत आहे. पण यावेळी विद्युत खूप फास्ट पुढे निघून जातो. त्यामुळे ही रस्सी जोरात खेचली जाते. यावेळी नोराचा तोल जातो आणि ती जमिनीवर जोरात आपटते.

नोरा इतक्या जोरामध्ये पडते की, शूटिंगवेळी उपस्थित असलेले सर्वजण तिच्या दिशेने धावत जातात. यावेळी विद्युतला देखील मोठा धक्का बसतो. त्यानंतर चित्रपटाची संपूर्ण टीम नोराला उचलण्यासाठी जाते. नोराचा हा व्हिडीओ पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसतो. या व्हिडीओवर कमेंट्स करत नोराच्या चाहत्यांनी तिला सुपरवुमन आणि प्राऊड गर्ल असे देखील म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -