विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असणारी 12 वीची परीक्षा आता अवघ्या काही वेळात सुरू होत असून, सर्व विद्यार्थी परीक्षेसाठी सज्ज झाले आहेत. परीक्षा पुढ्यात असतानाच चंद्रपूर शहरातून मात्र एक अतिशय धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. चंद्रपूरमध्ये 12 वीच्या विद्यार्थितीने टोकाचं पाऊल उचललं आहे. 12 वी च्या त्या विद्यार्थिनीने गळपास लावून घेत स्वत:चं आयुष्य संपवल्याचा धक्कादायरक प्रकार उघडकीस आला आहे.चंद्रपूर शहरातील सुमित्रनगर भागातील ही दुर्दैवी घटना आहे.
अनिशा (वय 19) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने तिच्या नोटबूकवर ‘सॉरी’ असा एकच शब्द लिहीला आणि टोकाचं पाऊल उचलत हे अनमोल आयुष्य संपवलं. परीक्षेच्या तणावामुळे तिने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आली आहे. अवघ्या 19 वर्षांच्या विद्यार्थिनीच्या या धक्कादायक कृत्यामुळे परिसरात सर्वांनाचा धक्का बसला असून हळहळ व्यक्त होत आहे.
मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती
दरम्यान राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आज, 21 फेब्रुवारीपासून सुरुवात आहे. पुण्यात परीक्षा केंद्रांवरती विद्यार्थ्यांची लगबग सुरू असून थोड्याच वेळात बारावीचा पहिला पेपर सुरू होईल. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी यायला सुरुवात झाली असून राज्यातील ल 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
विशेष म्हणजे, परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिट वेळ वाढवून देण्यात येणार आहे. तसेच परीक्षेच्या भीतीने, विद्यार्थ्यांना मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्तीही करण्यात आली आहे. परीक्षेच्या काळात कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी राज्यात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
सकाळच्या सत्रात ११ वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी १०.३० वाजता तर दुपरच्या सत्रात ३ वाजता सुरू होणाऱ्या परीक्षांसाठी विद्यार्थी यांनी २.३० पर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थितीत राहणे अनिवार्य आहे.