Wednesday, March 12, 2025
Homeसांगलीपोलीस भरतीचं स्वप्न अपघाताने भंगलं! सरावासाठी जाताना गाडीची धडक, एकाचा मृत्यू

पोलीस भरतीचं स्वप्न अपघाताने भंगलं! सरावासाठी जाताना गाडीची धडक, एकाचा मृत्यू

पोलीस भरतीच्या सरावासाठी दोन दुचाकी वाहनांवरून निघालेल्या चार तरुणांना भरधाव वाहनाने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघताता एक तरुण जागीच ठार झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.यामुळे तरुणांच्या कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. नोकरीच्या आशा या अपघाताने मावळल्या आहेत. आता अपघातग्रस्तांना शासनाने वैद्यकीय उपचार आणि आर्थिक मदत करावी अशी मागणी तरुणांना भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्यांनी केलीय. सांगलीच्या मिरज तालुक्यात भोसे इथं हा अपघात घडला.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील भोसे येथील तरुण सांगली जिल्हा क्रीडा संकुल कडे निघाले होते.

पोलीस भरतीच्या सरावासाठी दोन दुचाकी वाहनावरून जात असताना चौघां तरुणांना भरधाव वेगाने मागून येणाऱ्या पिकप वाहनाने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात एक तरुण जागीच ठार तीन जण गंभीर जखमी झालेय

 

शिरीष अमसिद्ध खंबाळे वय 21 राहणार भोसे असं जागीच ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर विश्वजीत विजय मोहिते (वय 24), प्रथमेश उत्तम हराळे (वय 24), दोघे राहणार भोसे , प्रज्वल साळुंखे (वय 24) राहणार कसबे डिग्रज अशी गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी दोन मोटरसायकल वरून पहाटेच्या सुमारास हे चार तरुण सांगली क्रीडा संकुल येथे येत होते. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कलंबी जवळ आले असता मागून येणाऱ्या भरधाव पिकप वाहनाने जोरदार धडक दिली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर भोसे गावातील नातेवाईक व पोलिस भरती सराव करणाऱ्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील दोघा तरुणांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर प्रज्वल साळुंखे याला खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गरीब कुटुंबातील हे तरुण पोलीस भरतीसाठी जीवाचे रान करत होते. शिरीष खंबाळे हा जागीच ठार झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाता मध्ये जागीच ठार झालेल्या आणि जखमी तरुणांना शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी प्रशिक्षकांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -