इचलकरंजी – मराठा आरक्षण संदर्भात काही मंडळीडून मनोज जरांगे-पाटील यांना भटकवण्याचा प्रयत्न काही मंडळीकडून केला जात आहे. त्यामुळे जरांगे-पाटील संयम बाळगावा. यामधून निश्चितपणे मार्ग निघू शकेल, असे आवाहनमहाराष्ट्र क्रांती सेना पक्षाचे संस्थापक सुरेशदादापाटील यांनी केले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी जरांगे-पाटील यांचेउपोषण सुरु आहे. तर गत सात ते आठ महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी त्यांचा लढा सुरुच आहे. सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी ते ठाम असून त्यासाठी त्यांनी उपोषण सुरु केले होते. मात्र, राज्य सरकारने जरांगे यांच्याशी चर्चा न करता विशेष अधिवेशन बोलावत मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण दिले. पण, ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यावे आणि सगे सोयरे अध्यादेश लागू करावा, यासाठी जरांगे यांचे उपोषण सुरु आहे. असे असताना आज अचानकपणे त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत थेट मुंबईकडे रवाना झाले आहेत.
जरांगे पाटील यांची मागणी रास्त असली तरी त्यांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. काही मंडळीजरांगे यांच्यावर टीका करत त्यांना भडकवत आहेत. सुरु असलेले आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेजरांगे यांनी चर्चेतून मार्ग निघू शकतो हे समजून घेऊन आपले अहिंसक व शांततेने सुरु असलेले आंदोलन बिघडू देऊ नये. हा प्रश्न सर्वजण मिळून मार्गी लावूया. पण संयम व आंदोलन बिघडू न देता करूया असेही सुरेशदादा पाटील यांनी आवाहन केले आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून शांतता संयमअख्ख्या जगालादाखवून देण्याचे कामकेलेले आहे आणि याच मराठा मोर्चाची शिस्तीची दखल लोकांनी घेतलेली आहे. असे असताना जरांगे यांनी कायदा हातात घेऊन ती शिस्त मोडू नये.बर्याच वर्षांनी समाज एकत्र आलेला आहे आणि याला जर कोणी छेद देण्याचा प्रयत्न करत असेल तर मराठा समाज त्याला कदापिही माफ करणार नाही, असेही सुरेशदादा यांनी म्हटले आहे.