Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रपोस्ट ऑफिस दाम दुप्पट योजना : सर्वांना फायदा.

पोस्ट ऑफिस दाम दुप्पट योजना : सर्वांना फायदा.

मित्रांनो, आजकाल प्रत्येक जण नोकरी सोबत side income चा पर्याय शोधत असतो. त्यासाठी कुणी छोटा मोठा व्यवसाय करतो तर कुणी stock market मध्ये invest करतो.आणि काही लोक केवळ कमावलेला पैसा जपून आणि साठवून ठेवतात. पैसे साठवण्यासाठी बँक व्यतिरिक्त हि अजून खूप सारे पर्याय आपल्या देशात उपलब्ध आहेत.

१ कोटी रुपयांची सरकारी लॉटरी जिंकण्याची संधी! (Government Lottery)

त्यापैकीच एक भरवश्याचा आणि आपल्या सर्वांचा आवडता option म्हणजे पोस्ट ऑफिस आणि त्याच्या विविध योजना!आज आपणही पोस्ट ऑफिस ची अशीच एक योजना- पोस्ट ऑफिस दाम दुप्पट योजना बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, जर तुम्हालाही तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील तर या योजनेबद्दल संपूर्ण माहिती या पोस्ट मध्ये वाचा.

काय आहे पोस्ट ऑफिस दाम दुप्पट योजना?

देशाचे केंद्र सरकार नागरिकांनी बचत केलेल्या पैशांना चांगला परतावा मिळावा यासाठी विविध योजना राबवित असते. जेणेकरून देशातील नागरिकांनाही बचतीची सवय होईल आणि त्यांना या बचतीवर चांगला परतावाही मिळेल हा त्यामागचा सरकारचा उद्देश असतो.

जूनपासून या देशामध्ये google pay बंद होणार, त्याआधी करुन घ्या हे काम

अशीच एक योजना किसान विकास पत्र योजना केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस योजनांअंतर्गत सुरु केली आहे.

किसान विकास पत्र योजना हि एक पोस्ट ऑफिस दाम दुप्पट योजना आहे.म्हणजेच या योजनेअंतर्गत गुंतवलेले पैसे ठराविक कालावधीनंतर दुप्पट होण्याची हमी दिली जाते.

ही योजना एक प्रकारची बचत योजना आहे. ज्याअंतर्गत गुंतवणुकीच्या ठराविक नेमून दिलेल्या कालावधीनंतर गुंतवणुकीची रक्कम दुप्पट होते.या योजनेअंतर्गत सहभागी होण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज करू शकता. या योजनेत गुंतवणूकदाराला 10 वर्षे आणि 4 महिने (124 महिने) गुंतवणूक करावी लागेल आणि 124 महिन्यांनंतर तुम्हाला दुप्पट पैसे मिळतील.

भाई डोकं लाव नीट….रोहित शर्मा आपल्याच खेळाडूंना असं का म्हणाला? Video

किसान विकास पत्र योजनेसाठी गुंतवणूक ₹ 1000 आहे. या गुंतवणुकीवर कोणतीही कमाल मर्यादा नाही. तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करता येईल.फक्त जर तुम्ही ५०,००० रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली तर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड तपशील द्यावे लागतील.

किसान विकास पत्र (KVP) व्याज दरवित्त मंत्रालयाने केलेल्या घोषणेनुसार KVP व्याजदर वेळोवेळी बदलू शकतात. KVP वर लागू असलेला सध्याचा व्याज दर 7.5% प्रतिवर्ष आहे (Q3 FY 2023-24) जो 124 महिन्यांत तुमची गुंतवणूक दुप्पट करेल.येईल.

किसान विकास पत्र योजनेचे अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे हि योजना एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्‍या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा एका बँक खात्यातून दुसर्‍या बँक खात्यात हस्तांतरित केली जाऊ शकते.

योजनेअंतर्गत भरवायची रक्कम चेक किंवा रोखीने भरता येते.किसान विकास पत्र योजनेअंतर्गत फॉर्म सबमिट केल्यानंतर, गुंतवणूकदाराला एक किसान विकास प्रमाणपत्र प्रदान केले जाईल ज्यामध्ये योजनेची maturity date, maturity amount आणि लाभार्थीचे नाव इत्यादी डिटेल्स असतील.

संकष्टी चतुर्थीला करा हे उपाय, गणपतीच्या कृपेने दूर होतील सर्व विघ्न

या योजनेअंतर्गत मिळणारा व्याजदर वेळोवेळी बदलू शकतो सध्या हा व्याजदर ७.५% आहे.या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदार गुंतवलेले पैसे कधीही काढू शकतो तथापि, योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्याच्या 1 वर्षाच्या आत पैसे काढल्यास त्या रकमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही आणि दंड देखील भरावा लागेल.

किसान विकास पत्र योजनेचा वापर कर्ज मिळविण्यासाठी हमी म्हणून देखील केला जाऊ शकतो.

अर्ज कसा करावा?

अतिशय फायदेशीर आणि रिस्कफ्री असणाऱ्या या पोस्ट ऑफिस दाम दुप्पट योजनेअंतर्गत कुणीही भारतीय नागरिक अर्ज करू शकतो.

अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किसान विकास पत्र योजना यासाठी अर्ज मागावा लागेल.त्यानंतर अर्जात विचारलेली माहिती योग्यरितीने भरावी सोबतच आवश्यक कागतपत्रे जोडून अर्ज त्याच पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावा.

शनिदेवाची ‘या’ प्रिय राशींवर असते नेहमी कृपा; जाणून घ्या, तुमची रास यात आहे का?

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -