Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूरात जुगार अड्ड्यावर छापा 22 जणांना अटक

कोल्हापूरात जुगार अड्ड्यावर छापा 22 जणांना अटक

कागल तालुक्यातील अर्जुनी येथील प्रकार; आठ लाखाचा मुद्देमाल(gambling) जप्त. कागल तालुक्यातील अर्जुनी या गावात श्री महालक्ष्मी सामाजिक कला क्रीडा व शैक्षणिक संस्था या नावाखाली सुरू असलेल्या अवैद्य जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी छापा टाकला. यावेळी 22 जणांना अटक करून त्यांच्याकडून सात लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस(gambling) निरीक्षक रवींद्र कळमकर यांना खबऱ्याकडून माहिती समजली होती की, कागल तालुक्यातील अर्जुनी गावात बेकायदेशीर रित्या मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात आहे. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व त्यांच्या पथकाला तातडीने या ठिकाणी छापा ठाकरेचे आदेश दिले त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून तब्बल 22 जणांना अटक केली.

त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य मोबाईल व रोख रक्कम असा जवळपास आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.जप्त केलेल्या मध्ये दोन लाख तीस हजार रुपयांची रोकड एक लाख 60 हजार रुपये किमतीचे 14 मोबाईल एक लाख रुपये किमतीच्या चार मोटरसायकली तीन लाख रुपयांचे एक कार असा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरे ,अंमलदार खंडेराव कोळी ,शिवाजी जामदार, विलास किरोळकर, संजय पडवळ, सचिन देसाईx संतोष पाटील सतीश जंगम राजू कांबळे आयुब गडकरी रफिक आवळकर यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -