Saturday, November 23, 2024
Homeतंत्रज्ञानगणिताचे प्रश्न सोडवण्यासाठी गुगलने आणलं खास अ‍ॅप

गणिताचे प्रश्न सोडवण्यासाठी गुगलने आणलं खास अ‍ॅप

गणित म्हटलं की कित्येक जणांना अजूनही दरारून घाम फुटतो. गुगलवर(google) शक्यतो सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात, मात्र पुस्तकातील किंवा वहीमध्ये लिहिलेल्या गणिताच्या प्रश्नांना गुगलवर सर्च करणं हे अगदीच किचकट काम आहे. यामुळेच गुगलने आता खास गणिते सोडवण्यासाठी नवं अ‍ॅप लाँच केलं आहे. फोटोमॅथ असं या अ‍ॅपचं नाव आहे.

Photomath हे अ‍ॅप गुगलच्या(google) प्ले-स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. गुगलने या कंपनीला 2022 साली अक्वायर केलं होतं. विद्यार्थ्यांना लर्निंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी मदत करणारं हे अ‍ॅप आता अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

नावातच दिल्याप्रमाणे, या अ‍ॅपवर जेव्हा तुम्ही एखाद्या गणिताचा फोटो काढून अपलोड कराल; तेव्हा ते या प्रश्नाचं स्टेप-बाय-स्टेप सोल्यूशन तुम्हाला स्क्रीनवर दाखवतं. वर्ड प्रॉब्लेम, इक्वेशन, ट्रिग्नोमॅट्री, कॅल्क्युलस अशा कित्येक प्रकारच्या गणितांना हे अ‍ॅप आरामात सोडवू शकतं.केवळ फोटोच्या स्वरुपातच नाही, तर मॅन्युअली देखील यामध्ये गणिताचे प्रॉब्लेम एंटर करू शकता. एखादं गणित एकापेक्षा अधिक प्रकारे सोडवता येत असेल, तर त्याबाबत देखील हे अ‍ॅप माहिती देऊ शकतं. गणिताचा फोटो अपलोड करताना तो स्पष्ट असावा, तसंच प्रश्नातील एखादा भाग कट होणार नाही याची खबरदारी घेणं गरजेचं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -