Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी, आरोपी अखेर जेरबंद

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी, आरोपी अखेर जेरबंद

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरण्यात आली होती. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. ही धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणारा मुख्य आरोपी किंचक नवले (Kinchak Navale) याला पोलिसांनी साताऱ्यातून अटक केली आहे. त्याला वांद्रे येथील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

काय आहे प्रकरण ?

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषा वापरून त्यांन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ही वक्तव्य असणारा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी किंचक नवलेला सातारा येथून अटक करण्यात आली आहे.

तसेच हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून व्हायरल करणाऱ्या, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांनाही ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -