Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रवसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना

वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना: राज्यातील बहुतांश युवक सुशिक्षित असून त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकऱ्या उपलब्ध नाहीत त्यामुळे ते स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असतात परंतु उद्योग सुरु करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते परंतु आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांच्याजवळ उद्योग सुरु करण्यासाठी पुरेसे भांडवल उपलब्ध नसते तसेच त्यांना कोणी पैसे उधार देत नाहीत त्यामुळे राज्यातील युवकाची स्वतःचा उद्योग सुरु करण्याची इच्छा असून सुद्धा त्याला उद्योग सुरु करता येत नाही व त्यामुळे राज्यातील बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चाललेली शासनाच्या निदर्शनास आली त्यामुळे राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास वर्गातील युवकांचा आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राज्यात Vasantrao Naik Karj Yojana ची सुरुवात केली.

 

या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी 1 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले जाते.वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कर्ज योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्‍या आर्थिक दृष्‍ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास करणे. [वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना]वाचकांना विनंती

 

आम्ही Vasantrao Naik Karj Yojana ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात असे कोणी विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती व विशेष मागासवर्ग प्रवर्गातील नागरीक असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेअंतर्गत अर्ज करून कर्ज मिळवून स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करू शकतील.वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना चे उद्दिष्ट

महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.

नागरिकांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे.

नागरिकांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना आत्मनिर्भर बनविणे.

राज्यातील बेरोजगारी कमी करून राज्याचा औद्योगीक विकास करणे.

राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे.

राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे. [वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना]Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana चे वैशिष्ट्य

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाद्वारे वसंतराव नाईक कर्ज योजना ची सुरुवात करण्यात आलेली आहे.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येत नाही.

या योजनेअंतर्गत शासनाचा सहभाग 100 टक्के आहे.

योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदाराला शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही व त्यामुळे अर्जदाराचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.

कर्जाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल. [वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनाVasantrao Naik Loan Yojana अंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य

राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करण्यासाठी 1 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

योजनेअंतर्गत 1 लाखांपैकी 75,000/- रुपये पहिला हफ्ता स्वरूपात दिला जाईल आणि योजनेचा उर्वरित दुसरा हफ्ता 25000/- रुपये प्रत्यक्ष उद्योग सुरु झाल्यावर 3 महिन्यानंतर जिल्हा व्यवस्थापकांच्या तपासणी अभिप्रायानुसार दिला जाईल.

Vasantrao Naik Mahamandal Loan अंतर्गत दिले जाणारे प्राधान्य

निराधार व्यक्ती

विधवा महिला

शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तसेच शासकीय/निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली तसेच अनुभवी तरुण मुले/मुली यांना प्राधान्य देण्यात येते.

Vasantrao Naik Arthik Vikas Mahamandal Yojana चे लाभार्थी

महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरीक

VJNT Loan Scheme चा फायदा

योजनेअंतर्गत राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास वर्गातील युवकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.

राज्यातील युवकांचे जीवनमान सुधारेल.

राज्यातील बेरोजगारी संपेल व राज्याचा औद्योगिक विकास होईल.

राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येणार नाही. [वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना]

Vasantrao Naik Mahamandal Loan Yojana अंतर्गत लाभार्थ्यांची निवड

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या जिल्हा लाभार्थी निवड समितीमार्फत लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.वसंतराव नाईक कर्ज योजना मार्फत लाभार्थ्यास कर्जाच्या व्याज रकमेचा परतावा

उमेदवाराने वेळेत कर्जासह हफ्ते भरल्यास हफ्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम त्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. [वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना]

Vasantrao Naik Scheme अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची वसुली

कर्जाची परतफेड ही कर्ज वितरीत केल्याच्या 90 दिवसांनंतर सुरू करण्यात येईल त्यानंतर लाभार्थीकडून कर्जाच्या परतफेडीच्या रक्कमेचे पुढील दिनांकाचे आगाऊ धनादेश घेण्यात येतील

लाभार्थ्याला नियमित 48 महिने मुद्दल 2085/- रुपये परतफेड करावी लागेल.

नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थ्यांना जेवढे कर्जाचे हफ्ते थकीत होतील त्या रकमेवर द.सा.द.शे. 4 टक्के व्याज आकारण्यात येईल.

लाभार्थ्याने कर्जाचे हफ्ते भरले नाही व त्यामुळे वसुली न झाल्यास महामंडळाकडे ठेवलेल्या तारण तसेच जामीनदारांद्वारे कर्ज वसुली करण्यात येईल. [वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना]

वसंतराव नाईक योजना अंतर्गत खालील व्यवसाय सुरु करता येतील

कृषी क्लिनिक

मत्स्य व्यवसाय

संगणक प्रशिक्षण

पॉवर टिलर

हार्डवेअर व पेंट शॉप

सायबर कॅफे

चहा विक्री केंद्र

सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र

झेरॉक्स

स्टेशनरी

आईस्क्रिम पार्लर

मासळी विक्री

भाजीपाला विक्री

सलुन

ब्युटी पार्लर

मसाला उद्योग

पापड उद्योग

मसाला मिर्ची कांडप उद्योग

वडापाव विक्री केंद्र

भाजी विक्री केंद्र

ऑटोरिक्षा

डी. टी. पी. वर्क

स्विट मार्ट

ड्राय क्लिनिंग सेंटर

हॉटेल

टायपिंग इन्स्टीटयुट

ऑटो रिपेअरींग वर्कशॉप

मोबाईल रिपेअरिंग

गॅरेज

फ्रिज दुरूस्ती

ए. सी. दुरुस्ती

चिकन/मटन शॉप

इलेक्ट्रिकल शॉप

फळ विक्री

किराणा दुकान

आठवडी बाजारामध्ये छोटसे दुकान

टेलिफोन बुथ किंवा अन्य तांत्रिक लघु उद्योग इत्यादी

वसंतराव नाईकमहामंडळ योजना अंतर्गत आवश्यक पात्रता

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

Vasantrao Naik Mahamandal Karj Yojana चे नियम व अटी

फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.

महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.

अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 55 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे त्यामुळे 55 वर्षे वयाच्या वरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

अर्जदाराचे स्वतःचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे व ते खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.

अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.

लाभार्थ्याने गैर कानूनी व्यवसाय केल्यास त्याला दिलेला लाभ वसूल करण्यात येईल व त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

जर लाभार्थ्याने मध्येच नियमित कर्जाची परतफेड केली नाही तर अशा परिस्थिती व्याज परतावा दिला जाणार नाही.

लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टल वर उद्योग सुरु केल्याचे किमान 2 फोटो अपलोड करणे आवश्यक आहे.

लाभार्थ्याला फक्त महाराष्ट्र राज्यात व्यवसाय सुरु करता येईल व त्यामुळे लाभार्थ्याला महाराष्ट्राच्या बाहेर व्यवसाय सुरु करता येणार नाही.

अर्जदार हा कुठल्याही बॅंकेचा / वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

वvjnt loan scheme 2024 चा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे किंवा कार्यालयात ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला एकदाच या योजनेअंतर्गत अर्ज करता येईल.

लाभार्थ्याने सुरु केलेल्या व्यवसायाचा विमा स्व-खर्चाने उतरविणे तसेच दरवर्षी विम्याचे नुतनीकरण करणे बंधनकारक राहिल. [वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना]

अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

रहिवाशी दाखला

पॅन कार्ड

रेशन कार्ड

वीजबिल

मोबाईल नंबर

उत्पनाचा दाखला

ई-मेल आयडी

पासपोर्ट आकाराचे फोटो

प्रतिज्ञा पत्र

डोमेसाइल सर्टिफिकेट

जातीचा दाखला

जन्म प्रमाणपत्र (शाळा सोडल्याचा दाखला)

व्यवसाय सुरु करणार त्याचे कोटेशन

बँक खात्याची माहितीVasantrao Naik Loan Scheme Online Application

अर्जदाराला सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.

होम पेज वर नोंदणी वर क्लिक करावे लागेल.आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती (वैयक्तिक माहिती/पत्त्याचा तपशील/उत्पन्न,व्यवसाय,बँक तपशील/दस्तऐवज तपशील/घोषणापत्र) भरावी लागेल तसेच आवश्यक दस्तावेज अपलोड करावी लागतील सर्व माहिती भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करावे लागेल.

अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. [वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना]

VJNT Loan Scheme Offline Application

अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागात जाऊन वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.

अशा प्रकारे तुमची वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -